हैदराबादचा चेन्नईवर 6 गडी राखून दणदणीत विजय

वॉर्नर-बेअरस्टोच्या अर्धशतकांच्या जोरावर हैदराबादचा यंदाच्या हंगामातील चौथा विजय

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 11:25 PM IST

हैदराबादचा चेन्नईवर 6 गडी राखून दणदणीत विजय

हैदराबाद, 17 एप्रिल : वॉर्नर आणि बेअरस्टोच्या अर्धशतकांच्या जोरावर हैदराबादने चेन्नईवर 6 गडी राखून विजय मिळवला. चेन्नईने दिलेले 133 धावांचे आव्हान 16.5 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. धोनीच्या गैरहजेरीत खेळणाऱ्या चेन्नईला यंदाच्या हंगामातील दुसरा पराभव पत्करावा लागला. डेव्हिड वॉर्नरने 25 चेंडूत 50 धावांची वेगवान खेळी केली. तो बाद झाला तेव्हा संघाच्या 6.4 षटकांत 1 बाद 66 धावा झाल्या होत्या. वॉर्नरला दीपक चहरने बाद केले. वॉर्नरनंतर आलेल्या केन विल्यम्सन (3 धावा) आणि विजय शंकर (7 धावा) यांना इम्रान ताहीरने बाद केले. यानंतर बेअरस्टोने 39 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर दीपक हूडा संघाला अवघ्या 2 धावा हव्या असताना बाद झाला. शेवटी बेअरस्टोने षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला. त्याने 44 चेंडूत 61 धावा केल्या. यंदाच्या हंगामातील हैदराबादचा हा चौथा विजय आहे.

तत्पूर्वी, घरच्या मैदानावर खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद बाद 132 धावा केल्या. सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसीस यांच्या 79 धावांच्या भागिदारी संपुष्टात आल्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार सुरेश रैनाने 13 धावा केल्या. धोनीला दुखापतीमुळे या सामन्यात विश्रांती देण्यात आली असून त्याच्या अनुपस्थितीत सुरेश रैना नेतृत्व करत आहे.

नशेत गाडी चालवलेल्या क्रिकेटपटूच्या हाती वर्ल्ड कपचे नेतृत्व

चेन्नईच्या सलामीच्या जोडीने जोरदार फटकेबाजी सुरू असताना 9 व्या षटकानंतर टाइम आऊट घेतला. त्यानंतर हैदराबादच्या शाहबाज नदीमने चेन्नईची जम बसलेली जोडी फोड़ली. त्याने शेन वॉटसनचा त्रिफळा उडवला. वॉटसनने 29 चेंडूत 31 धावा केल्या. त्यानंतर विजय शंकरने फाफ डु प्लेसीसला बाद करून चेन्नईला दुसरा धक्का दिला. डु प्लेसीसनंतर सुरेश रैना 13 धावांवर आणि केदार जाधव 1 धाव काढून बाद झाले. या दोघांनाही राशिद खानने एकाच षटकात पायचित करून सलग दोन धक्के दिले. त्यानंतर खलील अहमदच्या गोलंदाजीवर सॅम बिलिंग्ज शून्यावर बाद झाला. रायडूने नाबाद 25 आणि जडेजाने नाबाद 10 धावा केल्या.

World Cup : इंग्लंडच्या संघात KKR चा खेळाडू इन तर राजस्थानचा आऊट

Loading...

दरम्यान, चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी दुखापतीने या सामन्यात खेळू शकला नाही. आता पुढच्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात तो पुन्हा खेळेल अशी आशा आहे. धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नईची धुरा सुरेश रैनाकडे सोपवण्यात आली आहे. रैना आयपीएलमध्ये 5 हजार धावांचा टप्पा पार करणाऱ्या दोन खेळाडूंपैकी एक आहे.

...तर पंत, रायडु आणि सैनीला वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी

...तर बरं झालं असतं, पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल, पाहा VIDEO


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 09:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...