चेन्नईला धक्का, मुंबईविरुद्धच्या सामन्यात नसणार 'हा' खंबीर आधार

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईने आतापर्यंत घरच्या मैदानावर एकही सामना गमावलेला नाही.

News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2019 07:33 PM IST

चेन्नईला धक्का, मुंबईविरुद्धच्या सामन्यात नसणार 'हा' खंबीर आधार

चेन्नई, 26 एप्रिल : आयपीएलमध्ये गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या चेन्नईचा घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सशी मुकाबला होणार आहे. या सामन्याआधीच चेन्नईला मोठा धक्का बसला आहे. तब्येत ठिक नसल्याने महेंद्रसिंग धोनी मुंबईविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. त्याच्याऐवजी सुरेश रैनाकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.

आतापर्यंत धोनी फक्त तीन वेळा चेन्नईच्या संघातून बाहेर बसला आहे. यंदाच्या आयपीएलमधील ही दुसरी वेळ आहे. हैदराबादविरुद्ध पाठदुखीने त्रस्त असलेल्या धोनीला विश्रांती देण्यात आली होती.

वाचा : धोनीसोबत खेळले होते वडील, आता मुलगा गाजवतोय IPL

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई गुणतक्त्यात अव्वल स्थानी आहे. त्यांनी 11 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. तर मुंबई 10 सामन्यात 6 विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईच्या घरच्या मैदानावर शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात मुंबईला प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हा विजय महत्त्वाचा आहे. तसेच आयपीएलमध्ये या दोन्ही संघांतील सामना नेहमीच चुरशीचा राहिला आहे.

आयपीएलच्या 12 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबईने चेन्नईला 37 धावांनी पराभूत केलं होतं. शुक्रवारी होत असलेला सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर होत असून इथं चेन्नईने यंदाच्या हंगामात पाच सामने जिंकले आहेत. त्यामुळे चेन्नईला घरच्या मैदानावर पराभूत करणं मुंबईसमोर मोठं आव्हान असेल. घरच्या मैदानावर धोनीच्या संघाला पराभूत करणं कठिण आहे. आतापर्यंत मुंबई आणि चेन्नई यांच्यात 25 सामने झाले आहेत. यापैकी मुंबईने 14 तर चेन्नईने 11 सामने जिंकले आहेत.

Loading...

पॉइंट टेबल


सर्वाधिक धावा करणारे फलंदाज


सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज


VIDEO: कालभैरवाच्या दर्शनानंतर वाराणसीमधून मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 07:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...