धोनी तर ब्रॉडबॅण्ड इंटरनेटपेक्षाही 'सुपर', एकदा हा VIDEO बघाच

धोनी तर ब्रॉडबॅण्ड इंटरनेटपेक्षाही 'सुपर', एकदा हा VIDEO बघाच

धोनीवर फलंदाजीवरून टीका करणारेही त्याच्या यष्टीरक्षणाचे कौतुक करतात.

  • Share this:

चेन्नई, 10 एप्रिल : आयपीएलमध्ये कोलकाताविरुद्धचा सामना 7 विकेटने जिंकून चेन्नईने यंदाच्या हंगामातील पाचव्या विजयाची नोंद केली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या चेन्नईने कोलाकाताला 108 धावांत रोखले. आंद्रे रसेल वगळता इतर फलंदाज चेन्नईच्या गोलंदाजांसमोर तग धरू शकले नाहीत.

रसेल मैदानात येण्यापूर्वी चेन्नईचा गोलंदाज दीपक चहरने टिच्चून मारा करताना केकेआरच्या तीन फलंदाजांना बाद केले. यामुळे केकेआरची अवस्था 6 बाद 47 अशी झाली होती. यात दीपक चहर शिवाय फिरकीपटूंनी तीन विकेट घेतल्या. हरभजनने एक आणि ताहीरने केकेआरच्या दोन फलंदाजांना तंबूत धाडले.

वाचा : पहाटे 5 वाजता विराट 'या' महिला क्रिकेटरला भेटला होता

इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर शुभमन गिलला धोनीने यष्टीचित केले. त्यानंतर रसेल सोबत 29 धावांची भागिदारी करणाऱ्या पियुष चावलाला ताहीरच्या गोलंदाजीवर धोनीने यष्टीचित केले. यात शुभमन गिलला समजण्याआधीच मागे उभा असलेल्या धोनीने बेल्स उडवल्या होत्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धोनीवर टीका करणारेही त्याच्या यष्टीरक्षणाचे कौतुक करतात.

कोलकाताने दिलेल्या 109 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने 17.2 षटकात 3 बाद 111 धावा केल्या. सलामीवीर वॉटसन 9 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. सुनिल नरेनच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला.सुनिल नरेननेच सुरेश रैनाला बाद केले. रैनाने 13 चेंडूत 14 धावा केल्या. डुप्लेसीने नाबाद 43 धावा केल्या. रायडुने 31 चेंडूत 21 धावा केल्या. त्याला पियुष चावलाने बाद केले. केदार जाधव 8 धावांवर नाबाद राहिला.

धोनी म्हणतो, इतके षटकार कोणी मारतं का? पाहा VIDEO

VIDEO : 'आमच्याकडे ना मोदीवाले आले, ना राहुलवाले'

First published: April 10, 2019, 8:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading