IPL 2019 : CSKला धक्का, धोनी दुखापतीमुळे बाहेर

2010 पासून पहिल्यांदा चेन्नई धोनीशिवाय मैदानात उतरणार

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 08:23 PM IST

IPL 2019 : CSKला धक्का, धोनी दुखापतीमुळे बाहेर

हैदराबाद, 17 एप्रिल : सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पाठदुखीमुळे विश्रांती देण्यात आली आहे. आता पुढच्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात तो पुन्हा खेळेल अशी आशा आहे. धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नईची धुरा सुरेश रैनाकडे सोपवण्यात आली आहे. रैना आयपीएलमध्ये 5 हजार धावांचा टप्पा पार करणाऱ्या दोन खेळाडूंपैकी एक आहे.यंदाच्या आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनी जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्याने 8 सामन्यात 230 धावा केल्या आहेत. यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. यातील 7 सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आहे. आयपीएलच्या गुणतक्त्यात चेन्नई 14 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.


Loading...


2010 पासून पहिल्यांदा चेन्नई धोनीशिवाय मैदानात उतरणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईने आतापर्यंत 3 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत धोनी केवळ तीन सामन्यांना मुकला आहे. यात 19 मार्च ते 23 मार्च दरम्यान झालेल्या तीन सामन्यात धोनी खेळू शकला नव्हता. यातील एका सामन्यात चेन्नईला पराभव पत्करावा लागला होता.

...तर बरं झालं असतं, पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल, पाहा VIDEO


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 08:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...