IPL : रसेलला रोखण्यासाठी धोनी वापरणार 'हे' अस्त्र

IPL : रसेलला रोखण्यासाठी धोनी वापरणार 'हे' अस्त्र

डेथ ओव्हरचा बादशहा असलेल्या रसेलच्या फटकेबाजीने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना धडकी भरते.

  • Share this:

चेन्नई, 9 एप्रिल : आयपीएलच्या 12 व्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे.या सामन्यात कोलकात्याचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलचं वादळ रोखण्याचं आव्हान चेन्नई सुपर किंग्जसमोर असणार आहे.

आंद्रे रसेलच्या फटकेबाजीने प्रतिस्पर्धी संघांच्या खेळाडूंमध्ये धडकी भरली आहे. त्याने सनरायझर्स हैदराबाद आणि आरसीबीविरुद्ध वेगवान खेळी करून सामन्याचं चित्र पालटलं होतं. या दोन सामन्यात रसेलने षटकारांचा पाऊस पाडत विजय मिळवून दिला होता.

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात रसेलला रोखण्यासाठी धोनी लेग स्पिनर इम्रान ताहिरचा वापर करण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंतची आकडेवारी पाहता फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर रसेलला खेळणं कठिण जात असल्याचं दिसतं. 2015 पासून त्याने लेग स्पिनर्सच्या 79 चेंडूंचा सामना केला आहे. यात त्याने 101 धावा करताना चारवेळा बाद झाला आहे. 2018 पासून रसेलने लेग स्पिनर्सविरुद्ध 8.56 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर इतर गोलंदाजांविरुद्ध 12.23 च्या सरासरीने धावा केल्या आहे.

वाचा : IPL : एकही चेंडू न टाकता 'या' खेळाडूला मिळणार 10 कोटी

रसेल सुरुवातीला सांभाळून खेळतो. यात त्याचे अनेक शॉट चुकतात. दिल्लीविरुद्ध त्याने पहिल्या चार चेंडूत फक्त एक धाव काढली होती. त्यानंतर 24 चेंडूत 61 धावा कुटल्या होत्या. चेन्नईची खेळपट्टी पाहता या मैदानावर फिरकीपटूंनी साथ मिळते. त्यामुळे इम्रान ताहिरला चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. तसेच ताहिरची गोलंदाजी रसेलविरुद्ध एक मोठं अस्त्र ठरू शकते.

आयपीएलमध्ये डेथ ओव्हर्समध्ये रसेलने यंदा 54 चेंडू खेळले असून यात त्याने 170 धावा केल्या आहे. या षटकांमध्ये त्याने 11 चोकार आणि 18 षटकार माले आहेत. फक्त फिरकीपटूच नाही तर वेगवान गोलंदाजीवरही रसेल बाद झाला आहे. मोहम्मद शमीने यॉर्करवर त्याला बोल्ड केलं होतं. पण नोबॉलने सामना फिरवला. तर दिल्लीविरुद्ध कसिगो राबाडानेही त्याला यॉर्करवर बोल्ड केलं होतं.

VIDEO: पराभवाच्या भीतीने महाआघाडीतले पक्ष एकत्र; मोदींचा महाआघाडीला टोला

First published: April 9, 2019, 5:16 PM IST

ताज्या बातम्या