आयपीएलच्या महागाईत 'हा' गोलंदाज ठरला कंजूष, मोडला 10 वर्ष जुना विक्रम

कोलकाताविरुद्धच्या सामन्यात दीपक चहरने 20 धावांत 3 बळी घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

  • Share this:

आयपीएलमध्ये मंगळवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सला 7 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात अशी कामगिरी झाली जी आयपीएलच्या इतिहासात कधीच झाली नाही. (photo credit : bcci)

महागाईच्या काळात आयपीएलला सर्वात कंजूष गोलंदाज मिळाला आहे. चेन्नईकडून खेळणाऱ्या या गोलंदाजाचं नाव आहे दीपक चहर.

दीपक चहरने कोलकात्याच्या फलंदाजांना जखडून ठेवत तब्बल 20 चेंडू निर्धाव टाकले.

चहरने आपल्या या कामगिरीने आयपीएलमधील 10 वर्ष जुना विक्रम मोडला.

याआधी दिल्लीचा गोलंदाज आशिष नेहरा आणि राजस्थानचा मुनाफ पटेल यांच्या नावावर विक्रम होता.

दोन्ही गोलंदाजांनी 2009 च्या हंगामात एका सामन्यात प्रत्येकी 19 निर्धाव चेंडू टाकले होते.

मुनाफ पटेलने चहरप्रमाणेच कोलकाताविरुद्धच टिच्चून गोलंदाजी केली होती.

आशिष नेहराने डेक्कन चार्जर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 19 निर्धाव चेंडू टाकले होते.

चहरने 20 चेंडू निर्धाव टाकले तरी त्याच्या चार चेंडूंवर 20 धावा काढल्या गेल्या. पहिल्या षटकात ओव्हर थ्रोमुळे 5 धावा, दुसऱ्या षटकात एक अवांतर धाव, तिसऱ्या षटकात 2 चौकार आणि चौथ्या षटकात एक षटकार अशा धावा काढल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2019 07:14 AM IST

ताज्या बातम्या