मुंबई, 12 मे : आयपीएलच्या 12 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी अंतिम सामना होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये या दोन्ही संघांची कामगिरी जबरदस्त अशी राहिली आहे. चेन्नईच्या प्रत्येक सामन्यावेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची लेक झिवाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. आताही दिल्लीविरुद्धच्या सामन्यानंतर तिचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.
झिवा आणि दिल्लीचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात झिवा पंतची शिकवणी घेताना दिसत आहे. हा व्हि़डिओ झिवाच्या इन्स्टाग्रामवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये रिषभ पंत आणि झिवा दिसत आहेत. झिवा पंतला हिंदी वर्णाक्षरे शिकवते. यावेळी झिवाने रिषभ पंतची एक चूकही पकडली.
रिषभ पंत झिवाच्या समोर अ, आ, इ,ई शिकताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. शेवटची दोन अक्षरं पंत म्हणत नाही. त्यावेळी झिवा पंतला ती म्हणायला सांगते. झिवाचे याआधीही भारतीय संघातील खेळाडूंसोबतचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
चेन्नई आणि दिल्ली यांच्यात क्वालिफायर सामन्यात लढत झाली होती. यात चेन्नईने दिल्लीला 6 विकेटने पराभूत केलं होतं. यामुळे सात वर्षांनी प्लेऑफमध्ये पोहचलेल्या दिल्लीचं आयपीएल जिंकण्याचं स्वप्न भंगलं.
SPECIAL REPORT: रायगड: राज ठाकरे इफेक्ट शिवसेना खासदाराला हॅट्रीकपासून रोखणार का?