कोहली, धोनी ज्यांच्यावर भडकले 'ते' पंच वर्ल्ड कपमध्ये देणार निर्णय

कोहली, धोनी ज्यांच्यावर भडकले 'ते' पंच वर्ल्ड कपमध्ये देणार निर्णय

आयसीसीने जाहीर केली वर्ल्ड कपसाठी निवड झालेल्या पंचांची यादी.

  • Share this:

दुबई, 26 एप्रिल : आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नो बॉल न दिल्याबद्दल पंचांवर राग काढला होता. त्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेसुद्धा पंचांवर राग व्यक्त करत थेट मैदानावर धाव घेतली होती. आता भारताचा कर्णधार म्हणून विराट इंग्लंडमध्ये उतरेल तेव्हा तेच पंच मैदानावर निर्णय देण्यासाठी असतील.

आयसीसीने लीगमधील पंचांची नावे जाहीर केली आहेत. यात सुंदरम रवि आणि ब्रूस ऑक्सनफर्ड यांचाही समावेश आहे. विराटने सुंदरम रवि यांच्यावर राग काढला होता. तर धोनी ऑक्सनफर्ड यांच्यावर नाराज होता. याशिवाय उल्हास गंधे यांनाही धोनीच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.

आसीसीनं 48 सामन्यांसाठी 16 पंच आणि 6 मॅच रेफरींची निवड केली आहे. यात गेल्या 4 वर्षांपासून आयसीसीच्या एलीट पॅनेलमध्ये स्थान मिळवलेल्या रवि यांचा समावेश आहे. तब्बल 11 वर्षांनी एलीट पॅनेलमध्ये समावेश करण्यात आलेले पहिले भरतीय ठरले होते. त्यांच्या आधी 2004 मध्ये एस. वेंकटराघवन पॅनेलमध्ये होते.

वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या पंचांमध्ये अलीम दार, कुमार धर्मसेना, मरायस एरास्मस, क्रिस गॅफनी, इयन गुड, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबरो, नाइजल लॉन्ग, ब्रूस ऑक्सनफर्ड, सुंदरम रवि, पॉल राइफल, रॉड टकर, जोएल विल्सन, मायकल गफ, रुचिरा पालियागुरुगे, पॉल विल्सन.

मॅच रेफरी – क्रिस ब्रॉड, डेविड बून, एंडी पायक्रॉफ्ट, जेफ क्रो, रंजन मदुगले, रिची रिचर्ड्सन.

VIDEO: कालभैरवाच्या दर्शनानंतर वाराणसीमधून मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल

First published: April 26, 2019, 3:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading