मुंबई, 12 मे : आयपीएलच्या 12 व्या हंगामातील अंतिम सामना मुंबई आणि चेन्नई यांच्यात होणार आहे. जगातील सर्वात महागडी अशी क्रिकेट लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलमध्ये विजेत्या संघांसह खेळाडूंवरही बक्षिसांचा वर्षाव होतो.
आयपीएलमध्ये यंदा विजेतेपद पटकावणारा संघ हा चौथ्यांदा विजेता ठरणार आहे. या विजेत्या संघाला 20 कोटी रुपये मिळणार आहेत. फायनलला पराभूत होणाऱ्या संघाला विजेत्या संघापेक्षा 8.5 कोटी रुपये कमी मिळतील. उपविजेता ठरणाऱ्या संघाला 12.5 कोटी रुपये दिले जातात.
याशिवाय इतर संघांनाही मोठी रक्कम दिली जाते. यात तिसऱ्या क्रमांकावरील संघाला 10.5 कोटी रुपये दिले जातात. यंदा दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पराभूत झालेल्या दिल्लीला ही रक्कम मिळेल. प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवलेल्या संघातील चौथ्या संघाला 8.5 कोटी रुपये मिळतात. यंदाच्या हंगामात इलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादला दिल्लीविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.
संघांशिवाय खेळाडूंनाही भरघोस बक्षिसे मिळतात. यामध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या फंदाजाला ऑरेंज कॅप मिळते. या खेळाडूला दहा लाख रुपयांचे बक्षिस दिले जाते. एका हंगामात सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या खेळाडूलासुद्धा दहा लाख रुपये मिळतात. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने गौरवतात. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर म्हणून एका खेळाडूची निवड केली जाते. तसेच आयपीएलमध्ये उदयोन्मुख खेळाडूचाही गौरव केला जातो. या खेळाडूंनासुद्धा 10 लाख रुपयांचे बक्षिस दिलं जातं.
SPECIAL REPORT: रायगड: राज ठाकरे इफेक्ट शिवसेना खासदाराला हॅट्रीकपासून रोखणार का?