Elec-widget

VIDEO : एका चेंडूवर दोनवेळा बाद होण्यापासून वाचले फलंदाज

VIDEO : एका चेंडूवर दोनवेळा बाद होण्यापासून वाचले फलंदाज

आयपीएलमध्ये कॉमेडी सर्कस, दोनवेळा क्षेत्ररक्षकांनी केलेल्या चुकीने फलंदाजांना जीवदान मिळाले.

  • Share this:

विशाखापट्टणम, 10 मे : दिल्लीने दिलेल्या 148 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईला पहिल्याच षटकात जीवदान मिळालं. चेन्नईच्या ट्रेन्ट बोल्टने टाकलेल्या पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर दिल्लीच्या डुप्लेसीसने फटका मारला. यावेळी फलंदाजामध्ये समन्वय नसल्याने दोघेही एकाच दिशेला धावले. मात्र, या संधीचा क्षेत्ररक्षकांना फायदा घेता आला नाही. त्यांनी ओव्हर थ्रो केल्याने चेन्नईला अवांतर धावा मिळाल्या.


तत्पूर्वी, चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी दिल्लीला 147 धावांवर रोखले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 9 बाद 147 धावा केल्या.दिल्लीला चेन्नईने तिसऱ्याच षटकात पहिला धक्का दिला. दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉला पायचित करून दीपक चाहरने पहिलं यश मिळवून दिलं. तिसऱ्या षटकात दीपक चाहरने टाकलेला चेंडू दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉला खेळता आला नाही. तो 5 धावांवर पायचित झाला. पृथ्वी शॉनंतर सलामीवीर शिखर धवन धोनीच्या हाती झेल देऊन बाद झाला. 14 चेंडूत 18 धावा करणाऱ्या धवनला हरभजनने बाद केले.

धवननंतर कुलिन मुनरो 20 धावांची भर घालून बाद झाला. त्याला रविंद्र जडेजाने ब्राव्होकरवी झेलबाद केलं. कर्णधार श्रेयस अय्यर संघाच्या 75 धावा झाल्या असताना ताहीरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 18 चेंडूत 13 धावा केल्या.

श्रेयस अय्यर पाठोपाठ अक्षर पटेलही बाद झाला. अक्षर पटेलने फक्त 3 धावा केल्या. ब्राव्होच्या गोलंदाजीवर ताहीरने त्याचा सीमारेषेवर झेल घेतला.अक्षर पटेल बाद झाल्यानंतर रिषभ पंत आणि रुदरफोर्ड यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुदरफोर्ड हरभजनसिंगच्या गोलंदाजीवर वॉटसनच्या हाती झेल देऊन तो बाद झाला. त्यानंतर किमो पॉलचा त्रिफळा उडवून ब्राव्होने दिल्लीला सातवा धक्का दिला. पंतने एका बाजुने सावध खेळ केला. मात्र, 19 व्या षटकात उंच फटका मारण्याच्या नादात दीपक चाहरच्या गोलंदाजीवर रिषभ पंत बाद झाला. त्याने 25 चेंडूत 38 धावांची खेळी केली. पंतनंतर जडेजाने ट्रेन्ट बोल्टला बाद केलं. त्याने 3 चेंडूत 6 धावा केल्या. अमित मिश्रा 6 तर इशांत शर्मा 10 धावांवर नाबाद राहिले.

Loading...

वाचा- आयपीएलमुळं भंगलं 'या' खेळाडूचं वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न, पण मुंबई इंडियन्स करणार मदत

वाचा- IPL 2019 : 'हे' चार भारतीय खेळाडू ठरवतील फायनलचं भवितव्य

वाचा- CSK vs DC : रिषभ पंतला रोखण्यासाठी ‘हा’ आहे धोनीचा मास्टरप्लॅन

VIDEO: ...तर अरविंद केजरीवाल राजकारण सोडणार का? गौतम 'गंभीर' आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2019 10:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...