मुंबई, 05 मे : बेंगळुरुने हैदराबादवर विजय मिळवून यंदाच्या हंगामाचा शेवट गोड केला. मात्र, आरसीबीच्या विजयाने हैदराबादचा प्लेऑफमध्ये प्रवेश अडचणीत आला. या सामन्यात हेटमायरने सर्वाधिक 75 धावा केल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर आरसीबीने हैदराबादवर विजय मिळवला. हेटमायर 60 धावांवर असताना भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर युसुफ पठाणने त्याचा झेल सोडला. त्यानंतर पुढच्या 10 चेंडूत हेटमायरने 15 धावा केल्या. हा झेल युसुफ पठाणने घेतला असता तर हैदराबाला विजय मिळवता आला असता.
हेटमायर आणि गुरुकिरत यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर बंगळुरुनं हा सामना जिंकला. हेटमायरनं 47 चेंडूत 75 धावा केल्या. तर, गुरकिरत सिंग मान यानं 48 चेंडूत 65 धावा केल्या. या दोघांच्या भागीदारीच्या जोरावर बंगळुरूनं हा सामना जिंकला. बंगळुरूच्या या विजयामुळं हैदराबादचं प्ले ऑफमध्ये जाणं मुश्किल झालं आहे. 175 धावांचा पाठलाग करताना, विराट कोहली आणि एबी लवकर बाद झाले. त्यानंतर हेटमायर आणि गुरकिरत सिंग यांनी एकहाती सामना जिंकून दिला.
बंगळुरूनं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान उमेश यादवच्या शेवटच्या ओव्हरमध्ये त्यानं तब्बल 27 धावा दिल्या. हैदराबादनं बंगळुरूला 176 धावांचे आव्हान दिलं. यात केन विल्यमसनची अर्धशतकी खेळी महत्त्वाची ठरली. सलामीला आलेल्या रिध्दीमान साहा आणि मार्टिन गुपतील यांनी 46 धावांची भागीदारी केली, त्यानंतर उमेश यादवनं हैदराबादला पहिला झटका दिला. त्यानंतर गुपतील 30 करत बाद झाला. सलग अर्धशतक करणाऱ्या मनिषा पांडेला या सामन्यात मात्र चांगली फलंदाजी करता आली नाही. मात्र, कर्णधार केन विल्यमसननं एकहाती सामना सांभाळला. केननं 43 चेंडूत 70 धावा केल्या. उमेश यादवच्या शेवटच्या ओव्हरमध्ये केननं 6,4,6,4 अश्या तब्बल 27 धावा दिल्या.
SPECIAL REPORT: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुलींकडून दाढी करून घेतो...