धोनी चुकलाच! जगातल्या बेस्ट पंचांनी दिला 'हा' सल्ला

क्रिकेट जगतातील उत्कृष्ट पंच सायमन टॉफेल यांनी अश्विनबाबतही आपले मत व्यक्त केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 27, 2019 05:40 PM IST

धोनी चुकलाच! जगातल्या बेस्ट पंचांनी दिला 'हा' सल्ला

दिल्ली, 27 एप्रिल : जगभरातील बेस्ट क्रिकेट पंच म्हणून सायमन टॉफेलने महेंद्रसिंग धोनीबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यावेळी धोनी मैदानात आला होता. धोनीची ही कृती चुकीची होती. त्याने पंचांशी बोलायला नको होतं असंही सायमन टॉफेल यांनी म्हटलं आहे.

सायमन टॉफेल यांनी सांगितलं की, धोनी मैदानात आला तेव्हा पंचांनी त्याच्याशी बोलायला नको होतं. तसेच त्याला मैदानाबाहेर जाण्यास सांगायला हवं होतं. अशा वेळी पंचांनी खेळाडूशी हुज्जत घालणं टाळलं पाहिजे.

पंचांनी आपल्या निर्णयावर ठाम रहायला हवं. कोणताही दबाव न पत्करता निर्णयाला महत्त्व दिलं पाहिजे. पंच त्यांच्या कामात बेस्ट असतात हे बाकीच्यांनी समजून घेतलं पाहिजे. कोणी अचूक असू शकत नाही मात्र ते उत्कृष्ट असू शकतात असंही सायमन टॉफेल यांनी म्हटलं आहे.

वाचा : World Cup : भारत-पाकिस्तान यांच्यात जिंकणार कोण? ज्योतिषाने केली भविष्यवाणी

अश्विनने जोस बटलरला केलेल्या मंकडिंग रन आऊटबद्दलही टॉफेल यांनी मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, अश्विनन योग्य होता. त्याने काही चुकीचं केलं नाही. क्रिकेटच्या नियमानुसार मंकडिंग पद्धतीने बाद करण्यापूर्वी फलंदाजाला इशारा देण्याची गरज नाही. पायचित किंवा धावबाद करताना कोणताच इशारा दिला जात नाही तर मंकडिंग करताना काय गरज? असा सवालही त्यांनी विचारला.

Loading...

वाचा : IPL 2019 : धोनीची कमाल, वडीलांनंतर 19 वर्षांनी मुलाला केलं बाद

...म्हणून भर रस्त्यात महिलेनं तरुणाला चपलेनं बडवलं, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2019 05:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...