IPL मध्ये 'अशी' कामगिरी करणारा गब्बर पहिलाच फलंदाज

शिखर धवनने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात नाबाद 97 धावांची खेळी केली.

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 12:12 PM IST

IPL मध्ये 'अशी' कामगिरी करणारा गब्बर पहिलाच फलंदाज

दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या खेळीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सला 7 विकेटने पराभूत केलं आहे. इडन गार्डनवर दिल्लीने पहिल्यांदा कोलकाताला हरवलं आहे. (photo : iplt20.com)

दिल्लीला 7 विकेटने विजय मिळवून देण्यात शिखर धवनने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 63 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 97 धावांची खेळी केली. ही धवनची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

शिखर धवनने आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा 90 पेक्षा जास्त धावा केल्या असून तो एक विक्रम आहे. त्याने 2011 मध्ये पंजाबविरुद्ध नाबाद 95 आणि 2018 मध्ये नाबाद 92 धावांची खेळी केली होती. त्याच्यानंतर विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, शेन वॉटसन आणि डेव्हिड वॉर्नर यांचा नंबर लागतो. त्यांनी प्रत्येकी दोन वेळा अशी कामगिरी केली आहे.

Loading...

दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने अजूनही टी20 मध्ये शतक केलेले नाही. आयपीएल मध्ये तीन वेळा तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन वेळा 90 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

शिखर धवनने आयपीएलमध्ये 150 सामने खेळले आहेत. त्याच्या आधी 11 खेळाडूंनी 150 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 12:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...