श्रेयस करायचा ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या सरावासाठी गोलंदाजी

श्रेयसने विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स आणि स्टोईनिस यांना बाद केले.

  • Share this:

 राजस्थान आणि आरसीही यांच्यातील सामना पावसामुळे 5 षटकांचा खेळवण्यात आला मात्र, पाऊस वाढल्याने पुन्हा सामना थांबवण्यात आला. त्यानंतर दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आला.

 या सामन्यात राजस्थानचा गोलंदाज श्रेयस गोपालनं हॅट्ट्रिक नोंदवली. श्रेयस गोपालने विराट कोहली, एबी डीव्हीलियर्स आणि स्टोईनिस यांना बाद केले. यंदाच्या हंगामातील ही दुसरी हॅट्ट्रिक असून याआधी सॅम करनने अशी कामगिरी केली आहे.

भारताने 2011 मध्ये 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी 17 वर्षीय खेळाडूने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सराव करण्यासाठी गोलंदाजी केली होती.

बेंगळुरूत नेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे फलंदाज सराव करत होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियन फलंदाज त्याच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करत होते.

भारताचा असलेल्या या गोलंदाजाने आता आयपीएलमध्ये धमाल केली आहे. त्याने आतापर्यंत विराट, विलियम्सन आणि डिव्हिलियर्स या दिग्गज फलंदाजांनाही बाद केलं आहे.

राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू श्रेयस गोपालने यंदाच्या आयपीएलमध्ये 13 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत.

श्रेयसने यंदाच्या हंगामात 5 वेळा संघाला पहिली विकेट मिळवून दिली आहे. एका फिरकीपटूसाठी ही मोठी गोष्ट आहे. त्याची कामगिरी अशीच राहिली तर त्याला टीम इंडियात एंट्री मिळू शकते. गोलंदाजीशिवाय फलंदाज म्हणूनही तो चमकला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 03:53 PM IST

ताज्या बातम्या