VIDEO : असं काय झालं की दुसऱ्याच चेंडूवर मुंबईला घ्यावा लागला डीआरएस?

हिटमॅन रोहित शर्माने पहिल्या चेंडूवर चौकार मारून चांगली सुरुवात केली पण पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.

News18 Lokmat | Updated On: May 7, 2019 10:12 PM IST

VIDEO : असं काय झालं की दुसऱ्याच चेंडूवर मुंबईला घ्यावा लागला डीआरएस?

चेन्नई, 07 मे : प्ले ऑफमधील पहिल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या 132 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. दीपक चाहरच्या चेंडूवर अपील केल्यानंतर पंचानी रोहित शर्माला बाद दिले. त्यानंतर डीआरएसचा निर्णय रोहित शर्माने घेतला. त्यातही पंचांचा निर्णय़ योग्य असल्याने रोहित शर्मा बाद ठरला. त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून धडाक्यात सुरुवात केली. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईला धोनी आणि रायडूच्या भागिदामुळे 20 षटकांत 4 बाद 131 धावा करता आला. फिरकीला साथ देणाऱ्या चेपॉकवर मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीला चेन्नईच्या फलंदाजांना एका पाठोपाठ बाद केलं. तिसऱ्याच षटकात राहुल चाहरने डुप्लेसीसला बाद करून चेन्नईला पहिला धक्का दिला. डुप्लेसीसने फक्त 6 धावा केल्या. त्यानंतर पुढच्याच षटकात आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या जयंत यादवने सुरेश रैनाला बाद केले. रैनाने 7 चेंडूत 5 धावा केल्या. चेन्नईच्या शेन वॉटसनला कृणाल पांड्याने जयंत यादवकरवी झेलबाद केले. वॉटसनने 10 धावा केल्या.


आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर मुरली विजयने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही चाहरने बाद करून मोठा अडथळा दूर केला. मुरली विजयने 26 चेंडूत 26 धावा केल्या. यावेळी चेन्नईच्या 4 बाद 65 धावा झाल्या होत्या. त्यानंतर धोनी आणि रायडुने 66 धावांची अभेद भागिदारी केली. धोनीने 29 चेंडूत 37 धावा केल्या. तर रायडूने 37 चेंडूत 42 धावा केल्या.

चेन्नईने आजच्या सामन्यात मैदना फिरकीला अनुकूल असल्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईचा खेळाडू केदार जाधव दुखापतीमुळे बाहेर पडला असून त्याच्या जागी मुरली विजयला संघात स्थान मिळाले आहे.

Loading...

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा नाणेफेक झाल्यानंतर बोलताना म्हणाला की, आम्हीसुद्धा पहिल्यांदा फलंदाजीच घेतली असती. आमचे या मैदानावरील रेकॉर्ड चांगले असले तरी आजची कामगिरी महत्त्वाची आहे. संघात मॅकग्लेनच्या जाही जयंत यादवला संधी दिल्याचे रोहित शर्माने सांगितले.

चेपॉकची खेळपट्टी फिरकीला अनुकूल आहे. या मैदानावर 2010 पासून चेन्नईला मुंबईविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही.


VIDEO: लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलं भाकीत


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2019 09:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...