VIDEO : पंत... हे वागणं बरं नव्हे! रैनाने मारला धक्का

चेन्नईचा फलंदाज सुरेश रैनाला दिल्लीचा यष्टीरक्षक रिषभ पंतने डिवचलं.

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 11:25 PM IST

VIDEO : पंत... हे वागणं बरं नव्हे! रैनाने मारला धक्का

चेन्नई, 01 मे : आयपीएलमध्ये खेळाडू जबरदस्त फटकेबाजी करताना दिसतात. एकाच देशाकडून खेळलेले खेळाडूही लीगमध्ये एकमेकांविरोधात उभे ठाकतात. अनेकदा वादाचे प्रसंगही उद्भवतात. मात्र, दिल्ली कॅपिटलचा यष्टीरक्षक रिषभ पंतने चेन्नईविरुद्धच्या सामन्यावेळी रैनाला डिवचलं.

रैना फलंदाजीसाठी क्रिजवर आला तेव्हा पंतने त्याला डिवचलं. रिषभ पंत रैनाच्या वाटेत उभा राहिला. जेव्हा रैना पुढे जाऊ लागला तेव्हा पंतने त्याला अडवलं. पंतच्या अशा वागण्यानंतर रैनाने त्याला खांद्यानं धक्का दिला आणि आपल्या वाटेनं निघून गेला. यानंतर रिषभ पंत आणि रैना हसत हसत आपआपल्या जागेवर पोहचले.चेन्नईच्या संघातील अनेक खेळाडूंसोबत रिषभ पंतची चांगली दोस्ती आहे. याआधीही त्याने अशी गंमत केली आहे.

Loading...

पॉइंट टेबल


सर्वाधिक धावा करणारे फलंदाज


सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज


SPECIAL REPORT: दुष्काळ आणि पाणीबाणीनं होरपळणाऱ्या गावाची गोष्टबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 11:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...