चेन्नई, 9 एप्रिल : केकेआर आणि सीएसके यांच्यात चेपॉकवर लढत सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सार्थ ठरवत चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने केकेआरच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले. त्यानंतर इम्रान ताहीरने दोन विकेट घेतल्या तर हरभजन सिंगने एक गडी बाद केला. 12 षटकांत केकआरच्या 6 बाद 56 धावा झाल्या होत्या.त्यानंतर रसेलच्या अर्धशतकामुळे 109 धावांचे आव्हान चेन्नईसमोर ठेवता आले.
इम्रान ताहीरने टाकलेल्या 13 व्या षटकात हरभजन सिंगने केकेआरचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलचा उंच उडालेला झेल सोडल्यानंतर संपूर्ण स्टेडियममध्ये सर्वांनाच धक्का बसला. काही क्षण मैदानात पूर्ण शांतता पसरली होती. आंद्रे रसेलचाही यावर विश्वास बसला नाही. मैदानातील प्रत्येकाची एकसारखीच प्रतिक्रिया होती.
एक क्षण रसेलही आपण बाद झालो म्हणून हतबल झाला होता. पण जेव्हा झेल सुटल्याचे त्याला समजले तेव्हा काही वेळ त्याला विश्वासच बसला नाही. त्यानंतर त्याने सुटकेचा निश्वास टाकला.
"Reaction overload after Bhajji drops a skier"#harbhajansingh https://t.co/AMKUsBVFnz
— Suraj Yadav (@imyadavsuraj) April 9, 2019
यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात जास्त षटकारांचा पाऊस आंद्रे रसेलने पाडला आहे. त्याने 4 सामन्यात एकूण 22 षटकार लगावले आहेत.
CSK चा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर दीपक चहरच्या भेदक माऱ्याने केकेआरला 108 धावांत रोखले. केकेआरच्या पहिल्या चारपैकी तीन फलंदाजांना चहरने बाद केले. यंदाच्या आयपीएलमध्ये पाचवा विजय मिळवण्यासाठी चेन्नईला 109 धावांची गरज आहे. आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक वगळता इतर फलंदाज जास्त धावा करू शकले नाहीत. सुरुवातीला चहर आणि त्यानंतर इम्रान ताहीर, हरभजनच्या फिरकीपुढे नाइट रायडर्सच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. रसेलने 44 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या.यात 5 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. दिनेश कार्तिक 21 चेंडूत 19 धावा काढून ताहीरच्या गोलंदाजीवर बाद झाला. शुभमन गिलसुद्धा ताहिरची शिकार झाला. त्याने फक्त 9 धावा केल्या. पियुष चावला हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर यष्टीचित झाला. त्याच्यानंतर प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादवला भोपळाही फोडता आला नाही.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीला उतरलेल्या कोलकाताची सुरुवात निराशाजनक झाली. केकेआरचे 3 फलंदाज 10 धावांमध्ये तंबूत परतले. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने सलामीवीर ख्रिस लीनला पायचित केलं. त्यानंतर पुढच्या षटकात हरभजन सिंगने सुनिल नरेनला बाद केलं. सुनिल नरेनने 6 धावा केल्या. तर लिनला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर तिसऱ्या षटकात दीपक चहरने नीतीश राणाला शून्यावर बाद करून संघाला तिसरा धक्का दिला. पाचव्या षटकांत पुन्हा चहरनेच रॉबिन उथप्पाला बाद केले. उथप्पा 11 धावांवर झेलबाद झाला.
VIDEO: पराभवाच्या भीतीने महाआघाडीतले पक्ष एकत्र; मोदींचा महाआघाडीला टोला