VIDEO : विराटने वापरले अपशब्द, अश्विनने असा काढला राग

VIDEO : विराटने वापरले अपशब्द, अश्विनने असा काढला राग

शेवटच्या षटकात पहिला षटकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर झेल घेतल्यानंतर विराटच्या जल्लोषावरअश्विनने प्रतिक्रिया दिली.

  • Share this:

बेंगळुरू, 25 एप्रिल : एबी डिविलियर्स (नाबाद 82) आणि मार्कस स्टोइनस (नाबाद 46 ) धावांच्या जोरावर आरसीबीने पंजाबने 17 धावांनी विजय मिळवला. या सामन्यावेळी विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांचा एकमेकांवरचा राग प्रेक्षकांना बघायला मिळाला.

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विनचा सीमारेषेवर झेल पकडल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने आक्रमक जल्लोष केला. यावेळी त्याने अश्विनकडे बघून हातवारे केले. यानंतर मैदानातून बाहेर जाताना अश्विनने हातातील ग्लोव्हज फेकून राग व्यक्त केला.

पंजाबला शेवटच्या षटकात विजयासाठी 27 धावांची गरज होती. अश्विनने पहिल्या चेंडूवर षटकार मारला. मात्र, दुसऱ्याच चेंडूवर कोहलीने त्याचा झेल घेतला. यावेळी कोहलीने त्याच्या शैलीत विजयाचा जल्लोष साजरा करताना हातवारे केले.

अश्विन म्हणाला की, दोघेही सामना जिंकण्याच्या इराद्याने खेळत होतो. सामना रंगतदार स्थितीत आल्यावर केलेला जल्लोष स्वाभाविक होता. शेवटच्या तीन षटकात त्यांनी 60 पेक्षा जास्त धावा केल्या. आमच्या फलंदाजांना मात्र धावा काढता आल्या नाही.

पॉइंट टेबल

सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज

VIDEO: ...म्हणून मोदी पवारांविरोधात बोलतात- रोहित पवार

First published: April 25, 2019, 4:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading