अबब! आरसीबीच्या 'या' फलंदाजाची एक धाव इतक्या लाखांना

आरसीबीने त्यांच्या सर्वात महागड्या खेळाडूला 5 सामन्यात संधी दिली. एका सामन्यात त्याने विजयही मिळवून दिला.

News18 Lokmat | Updated On: May 5, 2019 02:41 PM IST

अबब! आरसीबीच्या 'या' फलंदाजाची एक धाव इतक्या लाखांना

वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज शिमरॉन हेटमायरनं आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात आरसीबीला विजय मिळवून दिली. त्याने गुरकिरत सिंग मानच्या साथीने शतकी भागिदारी करून संघाला शेवटच्या सामन्यात विजय मिळवून दिला.

हेटमायरने 47 चेंडूत 75 धावा केल्या. तर गुरकिरतने 48 चेंडूत 65 धावा केल्या. संघाची बिकट अवस्था झालेली असताना दोघांनी चौथ्या विकेटसाठी 144 धावांची भागिदारी केली.

आयपीएलच्या 12 व्या हंगामात हेटमायरला सुरुवातीच्या 4 सामन्यात फक्त 15 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवलं होतं.

Loading...

शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने हेटमायरला पुन्हा संधी दिली. या मिळालेल्या संधीचा फायदा उठवत त्याने तुफान फटकेबाजी केली.

हेटमायर आरसीबीचा सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला 2019 च्या लिलावात तब्बल 4.20 कोटी रुपये देऊन खरेदी केलं आहे.

हेटमायरने यंदाच्या आयपीएलमध्ये 5 सामन्यात फक्त 90 धावा काढल्या आहेत. म्हणजेच त्याची एक धाव 4 लाख 66 हजार रुपयांना पडली. यात शेवटच्या सामन्यातील कामगिरी वगळता इतर सामन्यात त्याला चमक दाखवता आली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2019 02:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...