अश्विनच्या 'त्या' फिरकीवर नेटकऱ्यांनी केली फटकेबाजी

अश्विनने सोशल मीडियावर एक पोस्ट केल्यानंतर त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.

  • Share this:

सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सोमवारी झालेल्या सामन्यात हैदराबादने 45 धावांनी विजय मिळवला. वॉर्नरच्या शतकानंतर राशिद खानच्या गोलंदाजीच्या जोरावर यंदाच्या आयपीएलमध्ये सहावा विजय नोंदवला.

सामन्यापूर्वी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने अश्विन ट्रोल झाला आहे. त्याने पोस्ट करून ड्रीम 11 मध्ये घेण्याची विनंती युजर्सना केली होती. त्यानंतर त्याच्यावर टीका करण्यात आली.

अश्विनने फोटो शेअर करताना लिहले की, मी गोलंदाजी, फलंदाजीसह नेतृत्वही करतो.मला ड्रीम 11 संघात घ्या. यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं.

एका युजरने म्हटलं की फक्त फलंदाजी, गोलंदाजी आणि नेतृत्वच नाही तर मंकडिंग चांगलं जमतं.

ड्रीम इलेव्हन च्या संघात घेण्यासाठी माझ्या मोबाईलवर रिचार्ज केल्यानंतर मी तुला संघात घेईन असंही एका युजरनं अश्विनला म्हटलं आहे.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अश्विनने चांगली कामगिरी केली. त्याने 30 धावात 2 विकेट घेतल्या. पंजाबचा मुजीब रहमान महागडा गोलंदाज ठरला त्याने 4 षटकांत 66 धावा दिल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2019 02:50 PM IST

ताज्या बातम्या