दिल्लीचं स्वप्न भंगलं, IPL फायनलला पुन्हा मुंबई विरुद्ध चेन्नई

दिल्लीचं स्वप्न भंगलं, IPL फायनलला पुन्हा मुंबई विरुद्ध चेन्नई

चेन्नईने आतापर्यंत प्रत्येकवेळी प्लेऑफमध्ये प्रवेश केला तर आठव्यांदा फाय़नलला धडक मारली आहे.

  • Share this:

विशाखापट्टणम, 10 मे : दिल्लीने दिलेले 148 धावांचे आव्हान चेन्नईने 4 गड्यांच्या मोबदल्यात 19 षटकांत पूर्ण केलं. या विजयासह त्यांनी फायनलला आठव्यांदा धडक मारली. फाफ डुप्लेसीस आणि शेन वॉटसन यांनी अर्धशतके केली. त्यानंतर रैनाने 11 धावा केल्या. तर रायडु 20 धावांवर नाबाद राहिला. धोनी उंच फटका मारण्याच्या नादात 9 धावांवर बाद झाला. या पराभवाने दिल्लीचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले.

तत्पूर्वी, चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी दिल्लीला 147 धावांवर रोखले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 9 बाद 147 धावा केल्या.दिल्लीला चेन्नईने तिसऱ्याच षटकात पहिला धक्का दिला. दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉला पायचित करून दीपक चाहरने पहिलं यश मिळवून दिलं. तिसऱ्या षटकात दीपक चाहरने टाकलेला चेंडू दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉला खेळता आला नाही. तो 5 धावांवर पायचित झाला. पृथ्वी शॉनंतर सलामीवीर शिखर धवन धोनीच्या हाती झेल देऊन बाद झाला. 14 चेंडूत 18 धावा करणाऱ्या धवनला हरभजनने बाद केले.

धवननंतर कुलिन मुनरो 20 धावांची भर घालून बाद झाला. त्याला रविंद्र जडेजाने ब्राव्होकरवी झेलबाद केलं. कर्णधार श्रेयस अय्यर संघाच्या 75 धावा झाल्या असताना ताहीरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 18 चेंडूत 13 धावा केल्या.

श्रेयस अय्यर पाठोपाठ अक्षर पटेलही बाद झाला. अक्षर पटेलने फक्त 3 धावा केल्या. ब्राव्होच्या गोलंदाजीवर ताहीरने त्याचा सीमारेषेवर झेल घेतला.अक्षर पटेल बाद झाल्यानंतर रिषभ पंत आणि रुदरफोर्ड यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुदरफोर्ड हरभजनसिंगच्या गोलंदाजीवर वॉटसनच्या हाती झेल देऊन तो बाद झाला. त्यानंतर किमो पॉलचा त्रिफळा उडवून ब्राव्होने दिल्लीला सातवा धक्का दिला. पंतने एका बाजुने सावध खेळ केला. मात्र, 19 व्या षटकात उंच फटका मारण्याच्या नादात दीपक चाहरच्या गोलंदाजीवर रिषभ पंत बाद झाला. त्याने 25 चेंडूत 38 धावांची खेळी केली. पंतनंतर जडेजाने ट्रेन्ट बोल्टला बाद केलं. त्याने 3 चेंडूत 6 धावा केल्या. अमित मिश्रा 6 तर इशांत शर्मा 10 धावांवर नाबाद राहिले.

दिल्ली कॅपिटल्सने संघात कोणताही बदल केलेला नाही. तर चेन्नईने मुरली विजयच्या जागी शार्दुल ठाकूरला संघात घेतलं आहे. यापूर्वी सात वर्षांपूर्वी दोन्ही संघाचा सामना दुसऱ्या क्वालिफायरमध्ये झाला होता. तेव्हा चेन्नईने दिल्लीला पराभूत केलं होतं. मात्र, फायनलला चेन्नईला कोलकाताने पराभूत करून विजेतेपद पटकावलं होतं.

दिल्ली आणि चेन्नई यांच्यात जो संघ सामना जिंकेल तो, मुंबईशी आयपीएलमध्ये भिडणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वायझॅकचे मैदान धोनीच्या आवडत्या मैदानांपैकी एक आहे. याच मैदानावर धोनीनं 2004मध्ये पाकिस्तान विरोधात आपली पहिलं एकदिवसीय शतक ठोकलं आहे. यात त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता. वायझॅकच्या मैदानावर धोनीनं 7 एकदिवसीय सामन्यात 65च्या सरासरीनं 260 धावा केल्या आहेत.

याच मैदानावर धोनी खेळला IPLमधली ‘यादगार’ खेळी

धोनीनं आयपीएल 2016मध्या पुणे संघाकडून खेळत होता. दरम्यान याच मैदानावर पंजाबविरोधात धोनीनं अक्षर पटेलच्या शेवटच्या ओव्हरमधल्या चार चेंडूवर सलग 4 षटकार लगावले होते. याच मैदानावर धोनीनं 32 चेंडूत 64 धावांची खेळी केली होती. त्यामुळं आजच्या सामन्यातही चाहत्यांकडून अशाच खेळीची अपेक्षा आहे.

दिल्ली विरोधात धोनीची तुफानी खेळी

चेन्नईच्या चाहत्यांमध्ये ‘थाला’ या नावानं प्रचलित असलेला धोनी दिल्ली विरोधात तुफान फलंदाजी करतो. दिल्ली विरोधात 21 सामन्यात 37च्या सरासरीनं 563 धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतक खेळींचा समावेश आहे. या हंगामात दिल्ली आणि चेन्नई यांच्यात दोन सामने झाले आहेत. त्यातील दोनही सामने चेन्नईनं जिंकले आहेत.

वाचा- आयपीएलमुळं भंगलं 'या' खेळाडूचं वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न, पण मुंबई इंडियन्स करणार मदत

वाचा- IPL 2019 : 'हे' चार भारतीय खेळाडू ठरवतील फायनलचं भवितव्य

वाचा- CSK vs DC : रिषभ पंतला रोखण्यासाठी ‘हा’ आहे धोनीचा मास्टरप्लॅन

VIDEO: ...तर अरविंद केजरीवाल राजकारण सोडणार का? गौतम 'गंभीर' आव्हान

First Published: May 10, 2019 07:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading