VIDEO : पाँटिंग की गांगुली? धर्मसंकटात अडकलेला पृथ्वी शॉ म्हणाला...

VIDEO : पाँटिंग की गांगुली? धर्मसंकटात अडकलेला पृथ्वी शॉ म्हणाला...

राजस्थान विरुद्धच्या सामन्यावेळी पृथ्वी शॉला कॉमेंटेटरने गांगुली आणि पाँटिंग यांच्यापैकी कोणाकडून शिकायला आवडतं? असा प्रश्न विचारला.

  • Share this:

दिल्ली, 23 एप्रिल : पृथ्वी शॉ आयपीएलमध्ये दिल्लीकडून डेअरडेव्हिल्ससाठी जबरदस्त कामगिरी करत आहे. दिल्लीच्या संघात राहून पृथ्वी शॉला रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली या दिग्गज क्रिकेटपटूंचं मार्गदर्शन मिळत आहे. मैदानावर आक्रमक फलंदाजी करणाऱ्या या फलंदाजाला दोन दिग्गजांपैकी कोण आवडतं असं विचारलं असता त्याने सावध प्रतिक्रिया दिली.

सोमवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यावेळी पृथ्वी शॉने माइकवरून संवाद साधला. त्यावेळी कॉमेंटेटरने त्याला प्रश्न विचारला की, रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली यांच्यातील कोण आवडतं? या प्रश्नावर कचाट्यात सापडलेल्या शॉने आवाज स्पष्ट येत नसल्याचं सांगितलं. यावेळी डगआऊटमध्ये बसलेल्या गांगुलीला हसू आवरलं नाही. त्यानंतर पुन्हा उत्तर देताना पृथ्वी शॉने दोन्ही दिग्गज आवडतात आणि त्यांच्याकडून शिकत असल्याचं म्हटलं.

वाचा : 25 चेंडूत शतक, सलग सहा षटकारांसह विश्वविक्रम

आयपीएलच्या आधी पृथ्वी शॉ अंडर 19 मध्ये खेळताना राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळला आहे. सध्या इंडिया ए संघातही द्रविड प्रशिक्षक आहे. राजस्थान रॉयल्सने दिल्लीला 192 धावांचे आव्हान दिले होते. या सामन्यात ऋषभ पंत आणि धवनच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर 19.2 षटकांत हे आव्हान पूर्ण केलं. या सामन्यात पृथ्वी शॉने 42 धावा केल्या होत्या. ऋषभ पंतसोबत तिसऱ्या गड्यासाठी 84 धावांची महत्त्वाची भागिदारी केली.

SPECIAL REPORT : राज ठाकरेंना जशास तसे उत्तर, लावा रे तो व्हिडिओ!

First published: April 23, 2019, 10:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading