धोनीला धमकी! झिवाचं अपहरण होईल, काळजी घे

धोनीला धमकी! झिवाचं अपहरण होईल, काळजी घे

महेंद्रसिंग धोनीसह त्याची मुलगी झिवाच्या चाहत्यांचीही संख्या मोठी आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात.

  • Share this:

मुंबई, 07 मे : चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मंगळवारी चेपॉकवर पहिली क्वालिफायर होणार आहे. चेन्नईला शेवटच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून पराभव पत्करावा लागला होता. किंग्ज पंजाब इलेव्हनचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं असलं तरी संघाची मालकीण प्रिती झिंटाचा उत्साह काही कमी झालेला नाही. संघाला जरी पुढची फेरी गाठता आली नसली तरी संघाच्या कामगिरीवर खूश असून ती संघाला प्रोत्साहन देण्यास नेहमीच पुढे असते. साखळी फेरीतील चेन्नईविरुद्धच्या शेवटच्या सामन्यावेळी ती उपस्थित होती. हा सामना पंजाबने 6 विकेटनं जिंकला.

आयपीएलच्या गुणतक्त्यात सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब या तीनही संघांचे समान गुण झाले. मात्र, रनरेटच्या जोरावर सनरायझर्सने बाजी मारली. सलग चार पराभवानंतर पंजाबने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला. या सामन्यावेळी प्रिती झिंटाने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली. तेव्हाचा धोनीशी हस्तांदोलन करत असलेला एक फोटो प्रिती झिंटाने शेअर केला आहे.

वाचा- IPL 2019 : कोण आहे 'ही' RCBची हॉट मिस्ट्री गर्ल ?

प्रिती झिंटाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन देताना म्हटलं आहे की, धोनीचे अनेक चाहते आहेत त्यात माझाही समावेश आहे. पण आता मी झिवाची फॅन आहे. इथं मी धोनीला सांगते की, त्याने काळजी घ्यावी. कदाचित मी तिचं अपहरण करेन असंही प्रितीने मजेत म्हटलं. तसेच या फोटोला कॅप्शन सुचवा असंही आवाहन चाहत्यांना केलं आहे.शेवटच्या सामन्यानंतर प्रिती झिंटाने स्पर्धेतील किंग्ज इलेव्हन पंजाबला सपोर्ट केल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले. तसेच किंग्ज इलेव्हन पंजाब पुढच्या वर्षी नक्की चांगली कामगिरी करेल असा विश्वासही तिने व्यक्त केला. पंजाबने 2014 मध्ये प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं. त्यांनी फायनललासुद्धा धडक मारली होती. मात्र, फायनलला त्यांना कोलकाताकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

वाचा- IPL 2019 : रोहितच्या 'या' हुकुमी एक्क्यानं धोनी देणार मुंबईला मात


VIDEO: लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलं भाकीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2019 05:16 PM IST

ताज्या बातम्या