मुंबई इंडियन्सच्या जय-पराजयावर 'या' चार संघांचे लक्ष

मुंबई आणि कोलकाता यांच्यातील लढतीनंतर प्लेऑफमधील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.

  • Share this:

आयपीएलच्या 12 व्या हंगामातील लीग सामन्यांतील शेवटचा सामना आज आहे. प्लेऑफमधील तीन संघ ठरले असून चौथा संघ कोणता? हे आजच्या सामन्यानंतर ठरणार आहे.

मुंबई आणि कोलकाता यांच्यात होणाऱ्या सामन्याच्या निकालावर चौथ्या स्थानावर कोण हे निश्चित होईल. चेन्नई, दिल्ली आणि मुंबईनं प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं आहे. कोलकाता नाइटरायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे.

सनरायझर्स हैदराबादचे 12 गुण झाले आहेत. कोलकाता नाइट रायडर्सने 13 सामन्यात 12 गुण मिळवले आहेत. मुंबईने जर मोठ्या फरकाने कोलकाताला पराभूत केले तर सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये स्थान मिळू शकते.

कोलकाताने मुंबईला पराभूत केलं तर ते प्लेऑफमध्ये पोहोचतील. त्यानंतर पुन्हा त्यांच्यात बुधवारी एलिमिनेटर सामना होईल. केकेआरला पराभूत केल्यास आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच 12 गुण मिळवून एखादा संघ प्लेऑफमध्ये पोहचला आहे.

रविवारी मुंबई कोलकाता यांच्या आधी पंजाब आणि चेन्नई यांच्यात सामना होणार आहे. चेन्नई पहिल्या आणि पंजाब शेवटच्या स्थानावर असल्याने या सामन्यातील जय-पराजयाचा प्लेऑफमध्ये पोहचणाऱ्या इतर संघांचा क्रम वगळता इतर काही फरक पडणार नाही.

चेन्नई आणि मुंबई जिंकल्यास दोन्ही संघ गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर पोहचतील. तर दिल्ली तिसऱ्या स्थानावर राहिल त्यामुळे त्यांना इलिमिनेटर सामना खेळावा लागेल.

गुणतक्त्यातील पहिल्या दोन्ही संघाना फायनलमध्ये पोहचण्यासाठी दोनवेळा संधी मिळते. पहिल्या क्वालिफायर सामन्यात पराभूत झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळून पुन्हा फायनलला पोहचता येते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2019 09:15 AM IST

ताज्या बातम्या