VIDEO : 'युवराजची दादागिरी, तु कोणाच्या जागेवर बसला आहेस माहिती आहे का?'

VIDEO : 'युवराजची दादागिरी, तु कोणाच्या जागेवर बसला आहेस माहिती आहे का?'

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सांगितला युवराजच्या पहिल्या भेटीचा वाईट अनुभव.

  • Share this:

मुंबई, 12 मे: आयपीएलच्या 12व्या हंगामात विजेतेपदासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात लढत होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स मैदानात उतरणार असून युवराज सिंगसुद्धा या संघाचा एक भाग आहे. युवराज आणि रोहित यंदाच्या हंगामात मुंबईच्या अनुभवी खेळाडूंपैकी आहेत.

विजेतेपदाच्या सामन्यापूर्वी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने एक मुलाखत दिली. यात त्याने युवराजसिंगबाबत काही गोष्टी उघड केल्या आहेत. यामध्ये त्याने युवराज सिंगसोबत झालेल्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं आहे.

रोहित शर्माने सांगितल की, युवराजसोबत पहिल्यांदा 2007 मध्ये भेट झाली होती. टी20 च्या वर्ल्डकपवेळी दोघे एकमेकांना भेटलो होतो. रोहितने यावेळी दोघांमध्ये झालेली चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे.

रोहित शर्माने म्हटलं की, युवराज माझ्यासाठी मोठ्या भावासारखा आहे. मात्र, आमच्या दोघांची पहिली भेट म्हणावी तशी चांगली नव्हती. युवराज बसमध्ये नेहमी एकाच जागेवर बसायचा. तेव्हाही तो आला पण त्यावेळी मी त्याच्या जागेवर बसलो होतो. तेव्हा युवराजने तुला माहिती आहे की ही कोणाची जागा आहे ? अशा भावनेने पाहिलं. याचा अर्थ तो गर्विष्ठ आहे असं नाही तो युवराज आहे. युवराज म्हणजे अॅटिट्यूड आणि बरंच काही असं रोहित शर्माने सांगितलं.युवराज मात्र रोहितच्या म्हणण्यावर सहमत दिसला नाही. युवराज म्हणाला की, रोहितने थोडं रंगवून सांगितलं आहे. मला आठवतं जेव्हा रोहित संघात आला होता तेव्हा त्याच्या हातात हात मिळवला होता. मी जागेवर बसताना सुद्धा ही कोणाची जागा आहे माहिती आहे का? असं विचारलं नव्हतं. तर ही माझी जागा आहे. मला तिथं बसायचं आहे असं म्हटल्याचं युवराजने सांगितलं.SPECIAL REPORT: रायगड: राज ठाकरे इफेक्ट शिवसेना खासदाराला हॅट्रीकपासून रोखणार का?
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2019 01:49 PM IST

ताज्या बातम्या