Elec-widget

धोनीने एका शब्दात सांगितले गोलंदाजीच्या निर्णयाचे कारण, पाहा VIDEO

धोनीने एका शब्दात सांगितले गोलंदाजीच्या निर्णयाचे कारण, पाहा VIDEO

कोलकाता विरुद्धच्या सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

  • Share this:

चेन्नई, 9 एप्रिल : कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल धोनीला विचारले असता त्याने 'दव' एकाच शब्दात गोलंदाजीच्या निर्णयाचे कारण सांगितले.

केकेआरविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंत धोनी म्हणाला की यात कोणतीही शंका नाही की आम्ही दवामुळे पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मैदानावर सतत दव पडतं. यामुळे मैदानावर दुसऱ्यांदा गोलंदाजी करणं कठिण आहे.कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकनेही सांगितले की, जर त्यांनी नाणेफेक जिंकली असती तर गोलंदाजीचा निर्णय घेतला असता. आता संघाला पहिल्यांदा फलंदाजी करायची आहे तर जास्ती जास्त धावांचे आव्हान ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आम्ही मैदानावर पडणाऱ्या दवाचा अभ्यास केला आहे मात्र या परिस्थितीत गोलंदाजी करणं आव्हानात्मक आहे.

Loading...

राजस्थान आणि चेन्नई यांच्यात 1 एप्रिलला झालेल्या सामन्यावेळी जोफ्रा आर्चरने म्हटले होते की, माझ्या करिअरमध्ये मी इतक्या वाईट परिस्थितीत गोलंदाजी केली नाही. चेन्नईची या मैदानावरील कामगिरी चांगली राहिली आहे. गेल्या 16 सामन्यात 15 वेळा चेन्नईने विजय मिळवला आहे.

VIDEO: पराभवाच्या भीतीने महाआघाडीतले पक्ष एकत्र; मोदींचा महाआघाडीला टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2019 08:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com