S M L

धोनीनं चेन्नईच्या विजयानंतर 'या' गोष्टीचं श्रेय दिलं पंतला

महेंद्रसिंग धोनीने दिल्लीविरुद्ध 44 धावांच्या वेगवान खेळीसह 2 फलंदाजांना यष्टीचित केलं.

News18 Lokmat | Updated On: May 2, 2019 03:09 PM IST

धोनीनं चेन्नईच्या विजयानंतर 'या' गोष्टीचं श्रेय दिलं पंतला

चेन्नई, 02 मे : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीचा 2019 चा वर्ल्ड कप शेवटचा असणार आहे. वर्ल्ड कपनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो. त्याच्यानंतर यष्टीरक्षणाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर असणार याबद्दल चर्चा होत आहे. यात रिषभ पंतचे नाव सातत्यानं पुढं येत असतं.

धोनीनंतर पंत यष्टीरक्षण करेल असं म्हटलं जात असलं तरी ते इतकं सोपं नाही. धोनीची जागा घेतल्यानंतर त्या खेळाडूकडून बऱ्याच अपेक्षा असतील. रिषभ पंतला धोनीची जागा घ्यायची असेल तर त्याला खूप काही शिकण्याची गरज आहे.

दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर धोनीने पंतच्या यष्टीरक्षणाबद्दल मत व्यक्त केलं. यावेळी त्याने चेन्नईच्या 20 व्या षटकात दिल्लीचा गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या वाइड गेलेल्या चेंडूचा उल्लेख केला. यष्टीमागे असलेल्या पंतने तो चेंडू दोन्ही ग्लोव्हजमध्ये पकडला. दरम्यान धोनीने धाव काढली. इथं पंतचा अनुभव कमी पडल्याचं दिसलं असं धोनी म्हणाला.


महेंद्रसिंग धोनी त्याच्या फटकेबाजीशिवाय यष्टीरक्षणासाठी ओळखला जातो. दिल्ली विरुद्ध त्याने 22 चेंडूत 44 धावा तर केल्याच. त्याच बरोबर 2 खेळाडूंना यष्टीचित केलं. या विजयानंतर धोनीने म्हटलं की, पंतने मला धावा काढायला मदत केली. त्याने चेंडू पकडल्यानंतर ग्लोव्हज काढले नव्हते. यामुळे त्याला चेंडू फेकायला उशिर झाला आणि आम्ही पळून धाव काढली. त्याला लहान लहान गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. लहानशा चुका दुर्लक्षित झाल्यास मोठी चूक होऊ शकते असंही धोनी म्हणाला.

गडचिरोली हल्ल्याची धक्कादायक माहिती समोर, घटनास्थळावरचा पहिला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2019 03:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close