IPL 2019 : हरभजनबद्दल धोनीच्या त्या निर्णय़ाने चेन्नईचा पराभव?

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईला फक्त एका धावेनं पराभूत करून मुंबई इंडियन्सने चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं.

News18 Lokmat | Updated On: May 16, 2019 03:43 PM IST

IPL 2019 : हरभजनबद्दल धोनीच्या त्या निर्णय़ाने चेन्नईचा पराभव?

आयपीएलच्या 12 व्या हंगामात मुंबईने चेन्नईवर एका धावेनं विजय मिळवला. या विजयासह मुंबईनं चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं. शेवटच्या चेंडुवर चेन्नईच्या शार्दुल ठाकुरला बाद करुन मलिंगाने मुंबई्च्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकुर बाद झाल्यानंतर डगआऊटमध्ये बसलेल्या हरभजनसिंगने बॅट आपटून राग व्यक्त केला. सामन्यानंतरही हरभजनने त्याचा राग व्यक्त केला. तो म्हणाला की, शेन वॉटसन बाद झाल्यानंतर मीच फलंदाजीला येणार होतो. तसं ठरलं असतानाही शार्दुल ठाकुरला मैदानावर पाठवण्यात आलं.

शार्दुल ठाकुर माझ्यापेक्षा वेगानं धावू शकतो असं सांगत त्याला पाठवल्यांच प्रशिक्षकांनी कारण दिलं होतं. मला संधी मिळाली असती तर मी पूर्ण प्रयत्न केले असते. याआधी अनेकदा भारतासाठी आणि मुंबई इंडियन्ससाठी दबावाच्या परिस्थितीत फलंदाजी केली आहे असं हरभजन म्हणाला.

Loading...

शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याऐवजी एकेरी - दुहेरी धावा काढण्यास सांगण्यात आल्या होत्या. मात्र, धोनीच्या जाग्यावर आपण असतो तर मोठा फटका मारण्यास सांगितलं असतं असं हरभजन म्हणाला.

कॅप्टन कूल धोनी त्याच्या डावपेचांच्या जोरावर सामना जिंकून देतो. यष्टीरक्षण करताना मैदानावर गोलंदाजांसह क्षेत्ररक्षणही कसे असावे याबद्दल मार्गदर्शन करतो. फलंदाजीवेळीसुद्धा सहकारी खेळाडूंना वेळोवेळी टिप्स देत असतो. मात्र, मुंबई विरुद्धच्या सामन्यात दबावात खेळण्याचा अनुभव असलेल्या हरभजनच्या जागी शार्दुल ठाकुरला पाठवणं चेन्नईला महागात पडलं.पुढे वाचा... 'थ्री मिस्टेक्स इन फायनल', धोनी स्वत:ला माफ नाही करणार

कॅप्टन कूल धोनी त्याच्या डावपेचांच्या जोरावर सामना जिंकून देतो. यष्टीरक्षण करताना मैदानावर गोलंदाजांसह क्षेत्ररक्षणही कसे असावे याबद्दल मार्गदर्शन करतो. फलंदाजीवेळीसुद्धा सहकारी खेळाडूंना वेळोवेळी टिप्स देत असतो. मात्र, मुंबई विरुद्धच्या सामन्यात दबावात खेळण्याचा अनुभव असलेल्या हरभजनच्या जागी शार्दुल ठाकुरला पाठवणं चेन्नईला महागात पडलं. पुढे वाचा... 'थ्री मिस्टेक्स इन फायनल', धोनी स्वत:ला माफ नाही करणार

आयपीएलच्या 12 व्या हंगामात शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सने चेन्नईला पराभूत करून चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. जसप्रीत बुमराह आणि राहुल चाहरच्या गोलंदाजीनंतर लसिथ मलिंगाने टाकलेल्या निर्णायक षटकाने सामना रोमहर्षक झाला.

चेन्नईच्या फलंदाजांना जीवदान मिळालं मात्र, त्याचा फायदा त्यांना घेतला आला नाही. तसेच सामन्यात केलेल्या तीन चुका त्यांना महागात पडल्या. यामुळे अवघ्या एका धावेनं विजेतेपदानं त्यांना हुलकावणी दिली.

पहिली चूक : वॉटसन नको म्हणत असताना रैनाने डीआरएसचा निर्णय घेतला. चाहरने टाकलेल्या 10 व्या षटकात रैनाला पायचित केलं होतं. तेव्हा वॉटसनने रैना बाद असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे डीआरएसची एक संधी चेन्नईने गमावली.

दुसरी चूक : मुंबईकडून सर्वात कमी धावा दिल्या त्या हार्दिक पांड्याने. त्याने एका षटकात फक्त तीन धावा दिल्या. एवढंच नाही तर या षटकात धोनी धावबाद झाला. ओव्हर थ्रोवर धाव घेण्याची धोनीची चूक चेन्नईला महागात पडली.

तीसरी चूक : सामन्याच्या शेवटच्या षटकात 9 धावा पाहिजे होत्या. तेव्हा क्रीजवर असलेल्या वॉटसन आणि जडेजासाठी या धावा जास्त नव्हत्या. मात्र, दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेण्याच्या नादात वॉटसन बाद झाला. तिथंच सामन्यात मुंबईने कमबॅक केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2019 03:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...