धोनीच्या बाद होण्यावर कमेंट करणं 'या' क्रिकेटपटूला ठरतंय त्रासदायक

धोनीच्या बाद होण्यावर कमेंट करणं 'या' क्रिकेटपटूला ठरतंय त्रासदायक

आयपीएलच्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनी बाद होता की नव्हता यावर अजूनही चर्चा होत आहे.

  • Share this:

मुंबई, 16 मे : मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर चेन्नईला पराभूत करून चौथ्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. त्यांच्या विजयाची जितकी चर्चा झाली नाही तेवढी चर्चा चेन्नईच्या पराभवाची  आणि धोनीच्या बाद होण्याची झाली. हैदराबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईने 150 धावांचे आव्हान चेन्नईला दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज होती. त्यावेळी मुंबईचा गोलंदाज लसिथ मलिंगाने शार्दुल ठाकुरला बाद करून संघाला विजय मिळवून दिला.

सामन्याच्या इतक्या दिवसांनंतरही धोनीच्या रनआउटची चर्चा सुरु आहे. तो बाद होता की नाही याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू जिनी नीशामने धोनीच्या चाहत्यांना ट्रोल करताना तो धावबाद असल्याचं ट्विट केलं होतं. आता त्याने धोनी धावबाद असल्याचं ट्विट डिलीट केलं आहे.

ट्विट डिलीट केल्यानंतर नीशामने नवीन ट्विट करताना म्हटलं की, मी धोनी बाद असल्याचं ट्विट डिलीट यासाठी केलं नाही की माझं मत बदललं. तर मला दिवसात 200 वेळा एकच कमेंट आल्याने त्रास झाला. खरंतर याचा मी विचार करत नाही. कृपया यापुढे मला ट्विट करून पुन्हा त्रास देऊ नका अशी विनंतीही त्याने केली आहे.

वाचा : IPL 2019 : हरभजनबद्दल धोनीच्या त्या निर्णय़ाने चेन्नईचा पराभव?

धोनी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला होता. यावेळी रिप्लेमध्ये एका कॅमेऱ्यात धोनी क्रिजमध्ये तर दुसऱ्या बाजूने तो बाहेर असल्याचं दिसत होतं. यामुळे वादही निर्माण झाला होता.

VIDEO: जनता होरपळतेय दुष्काळात, मंत्री सदाभाऊ खोत ACच्या गार वाऱ्यात!

First published: May 16, 2019, 5:12 PM IST

ताज्या बातम्या