घरच्या मैदानावर पराभव, धोनी काय म्हणाला पाहा VIDEO

घरच्या मैदानावर पराभव, धोनी काय म्हणाला पाहा VIDEO

यंदाच्या हंगामात चेन्नईला मुंबईविरुद्ध एकही सामना जिंकता आला नाही.

  • Share this:

चेन्नई, 08 मे : प्लेऑफच्या पहिल्या लढतीत चेन्नईला 6 विकेटने पराभूत करून मुंबई इंडियन्सने दिमाखात फायनलला प्रवेश केला आहे. सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने 132 धावांचे आव्हान पूर्ण केले.डावाच्या सुरुवातीला कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. दीपक चाहरच्या चेंडूवर अपील केल्यानंतर पंचानी रोहित शर्माला बाद दिले. त्यानंतर डीआरएसचा निर्णय रोहित शर्माने घेतला. त्यातही पंचांचा निर्णय़ योग्य असल्याने रोहित शर्मा बाद ठरला. त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून धडाक्यात सुरुवात केली. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चौथ्या षटकात क्विंटन डीकॉक तंबूत परतला. त्याला हरभजनसिंगने 8 धावांवार बाद केले. त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी 80 धावांची भागिदारी केली. इशान किशनला बाद करून इम्रान ताहीरने ही जोडी फोडली. इशानने 31 चेंडूत 28 धावा केल्या. त्याच्या पुढच्याच चेंडूवर ताहीरने कृणाल पांड्याला स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने संघाचा विजय साजरा केला. सुर्यकुमार यादवने 54 चेंडूत 71 धावा केल्या.पांड्याने 11 चेंडूत 13 धावा केल्या.

पराभवानंतर प्रतिक्रिया देताना चेन्नईचा कर्णधार धोनी म्हणाला की, खेळ म्हटलं की कोणी एक जिंकणार तर एक विजयी होणार. आज आमचा दिवस नव्हता. विशेष म्हणजे फलंदाजीत आम्ही कमी पडलो. 6 ते 7 सामने खेळूनही आम्हाला मैदानाचा अंदाज घेता आला नाही. घरच्या मैदानाचा फायदा उठवण्यात आम्ही कमी पडलो. क्षेत्ररक्षणावेळी झालेल्या चुकाही महागात पडल्या.

थेट फायनलला प्रवेश मिळाला नसला तरी गुणतक्त्यात पहिल्या दोनमध्ये असल्याने आनंदी आहे. त्यामुळे दोनवेळा फायनलला पोहोचण्याची संधी मिळाली आहे. अर्थात फायनलचा प्रवास थोडा लांबला असला तरी हा प्रवास चांगला होता असंही धोनी म्हणाला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईला धोनी आणि रायडूच्या भागिदामुळे 20 षटकांत 4 बाद 131 धावा करता आला. फिरकीला साथ देणाऱ्या चेपॉकवर मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीला चेन्नईच्या फलंदाजांना एका पाठोपाठ बाद केलं. तिसऱ्याच षटकात राहुल चाहरने डुप्लेसीसला बाद करून चेन्नईला पहिला धक्का दिला. डुप्लेसीसने फक्त 6 धावा केल्या. त्यानंतर पुढच्याच षटकात आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या जयंत यादवने सुरेश रैनाला बाद केले. रैनाने 7 चेंडूत 5 धावा केल्या. चेन्नईच्या शेन वॉटसनला कृणाल पांड्याने जयंत यादवकरवी झेलबाद केले. वॉटसनने 10 धावा केल्या.

आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर मुरली विजयने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही चाहरने बाद करून मोठा अडथळा दूर केला. मुरली विजयने 26 चेंडूत 26 धावा केल्या. यावेळी चेन्नईच्या 4 बाद 65 धावा झाल्या होत्या. त्यानंतर धोनी आणि रायडुने 66 धावांची अभेद भागिदारी केली. धोनीने 29 चेंडूत 37 धावा केल्या. तर रायडूने 37 चेंडूत 42 धावा केल्या.

VIDEO: लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलं भाकीत

First published: May 8, 2019, 10:13 AM IST
Tags: ipl 2019

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading