नाणेफेक हरल्यानंतरही 'असा' जिंकला धोनी, अय्यरनं घेतली गोलंदाजी

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरनं गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 08:25 PM IST

नाणेफेक हरल्यानंतरही 'असा' जिंकला धोनी, अय्यरनं घेतली गोलंदाजी

चेन्नई, 01 मे : आयपीएलच्या 12 व्या हंगामात दिल्ली आणि चेन्नई यांच्यात सामना सुरु आहे. यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला की, चेन्नईच्या मैदानावर दव पडतात त्यामुळे दुसऱ्यांदा गोलंदाजी करणं कठीण आहे. जरी श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली असली तरी धोनीच्या मनाप्रमाणे त्यानं निर्णय घेतल्याचं धोनीने दिलेल्या प्रतिक्रियेतून समजतं.

धोनी म्हणाला की, आम्ही नाणेफेक जिंकली असती तर फलंदाजीच घेतली असती. सध्या हवामानात बदल झाला असून ढगाळ वातावरण आहे. त्यातच वारं मोठ्या प्रमाणावर असल्यानं दव जास्त पडणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी फायद्याची ठरेल असं धोनी म्हणाला.

गेल्या 9 सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकली आहे. तर या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतरही त्याला हवा होता तसा निर्णय अय्यरने घेतला.


चेन्नईने आजच्या संघात मुरली विजय, ध्रुव शौर्य आणि मिशेल सेंटनर यांच्याऐवजी धोनी, जडेजा आणि डुप्लेसीस यांना पुन्हा घेतलं आहे. दिल्लीने रबाडा आणि इशांत शर्मा यांच्याजागी ट्रेंट बोल्ट आणि सुचितला संधी दिली आहे.

Loading...

पॉइंट टेबल


सर्वाधिक धावा करणारे फलंदाज


सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज


SPECIAL REPORT: दुष्काळ आणि पाणीबाणीनं होरपळणाऱ्या गावाची गोष्ट


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 08:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...