मुंबईविरुद्ध पराभवानंतर धोनीने 'या' खेळाडूवर काढला राग

मुंबईविरुद्ध पराभवानंतर धोनीने 'या' खेळाडूवर काढला राग

चेन्नईच्या घरच्या मैदानावर मुंबईने दणदणीत विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला.

  • Share this:

चेन्नई, 08 मे : पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईला पराभूत करून मुंबईने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून धोनीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय धोनीच्या अंगावर उलटला. चेन्नईला 20 षटकांत फक्त 131 धावा करता आल्या.

कॅप्टन कूल अशी ओळख असलेला धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये रागाने मैदानावर आल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्यानंतर क्वालिफायर 1 सामन्यात पुन्हा एकदा त्याचा रागाचा पारा चढला. मुंबईविरुद्धच्या सामन्यात केदार जाधवच्या जागी मुरली विजयची वर्णी लागली. यात त्याने 26 चेंडूत 26 धावा केल्या. राहुल चहरच्या चेंडूवर तो बाद झाला. धोनी आणि रायडूनंतर चेन्नईकडून केलेल्या या सर्वाधिक धावा होत्या. तरीही त्याला धोनीच्या रागाला सामोरं जावं लागलं.

मुंबईचा संघ फलंदाजी करत असताना गोलंदाज दीपक चाहरने पाचव्या षटकात सुर्यकुमार यादव बाद झाला असता. मात्र, मिड-ऑनला असलेल्या मुरली विजयच्या हातातून झेल सुटला आणि चेंडू सीमारेषेबाहेर गेला. त्यानंतर धोनीने मुरली विजयवर राग काढला. चेन्नईचे या सामन्यात क्षेत्ररक्षण गचाळ झाले. तसेच सुर्यकुमारचा झेल सोडणं चेन्नईला महागात पडलं.

पाचव्या षटकात जीवदान मिळालेल्या सुर्यकुमार यादवने 54 चेंडूत 10 चौकारांसह 71 धावा केल्या. सलामीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर सुर्यकुमार यादवने एकहाती सामना जिंकून दिला. त्याने या कामगिरीसह सामनावीर पुरस्कारही पटकावला.

वाचा-चेन्नईच्या फलंदाजांच्या 'या' चुका मी हेरल्या : सुर्यकुमार यादव

First published: May 8, 2019, 6:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading