KKR चा मुंबईवर 4 वर्षांनी विजय, किंग खानने 'असा' केला जल्लोष

इडन गार्डनवर आतापर्यंत झालेल्या 9 पैकी 3 सामन्यात केकेआरला मुंबईविरुद्ध विजय साजरा करता आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 29, 2019 09:03 AM IST

KKR चा मुंबईवर 4 वर्षांनी विजय, किंग खानने 'असा' केला जल्लोष

इडन गार्डनवर मुंबईला 34 धावांनी पराभूत केल्यानंतर किंग खान शाहरुखने जल्लोष केला. त्याने मैदानावर फेरीही मारली.

आयपीएलमध्ये कोलकात्याने मुंबईविरुद्ध तब्बल चार वर्षांनी विजय मिळवला.

रविवारी झालेल्या सामन्याच्या आधी 8 सामन्यात केकेआरला मुंबईविरुद्ध जिंकता आलं नव्हतं. हा सामना पाहण्यासाठी अभिनेत्री जुही चावला उपस्थित होती.

Loading...

हार्दिक पांड्याच्या तुफान फटकेबाजीनंतर शेवटच्या षटकांत धावा काढण्यात मुंबई अपयशी ठरली.

केकेआरने रसेल, शुभमन गिल आणि ख्रिस लिन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबईला 232 धावांचं आव्हान दिलं होतं.

केकेआरकडून आंद्रे रसेलने नाबाद 86 धावा केल्या. ख्रिस लिनने 54 तर शुभमन गिलने 76 धावा केल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबईचे सलामीवीर लवकर बाद झाले. मधल्या फळीत पोलार्ड आणि पांड्याने भागिदारी करून डाव सावरला.

पोलार्ड बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्याने तुफान फटकेबाजी करून विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या. पांड्या बाद झाल्यानंतर मुंबईची धावगती कमी झाली.

आयपीएलच्या इतिहासात आजपर्यंत कोलकाता आणि मुंबई यांच्यात 24 सामने झाले आहेत. यात कोलकाता फक्त 6 वेळा जिंकली आहे.

घरच्या मैदानावर झालेल्या 9 सामन्यात केकेआरला 3 वेळाच विजय मिळवता आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2019 08:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...