मुंबई, 13 मे : आयपीएलच्या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर मुंबईने चेन्नईला एका धावेनं पराभूत करून विजेतेपद पटकावलं. 20 व्या षटकात चेन्नईला 9 धावांची गरज होती. यात चेन्नईचा फलंदाज शेन वॉटसन आणि रविंद्र जडेजा मैदानात होते. मलिंगाच्या प्रत्येक चेंडूगणिक सामन्यात कोण जिंकणार याची उत्कंठा वाढत होती.
शेन वॉटसन अखेरच्या षटकात दुसरी धाव घेताना आऊट झाला आणि तिथेच सामना फिरला. वॉटसन बाद झाल्यानंतर शार्दुल ठाकुरला शेवटच्या चेंडूवर मलिंगाने यॉर्कर टाकून बाद केलं. याच चेंडूने मुंबईला विजेता ठरवले.
विजेत्या मुंबईला 20 कोटी तर उपविजेत्या चेन्नईला 12.5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. जर शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकुरला दोन धावा काढता आल्या असत्या तर चेन्नई विजेत ठरला असता आणि त्यांना 20 कोटींचे बक्षीस मिळाले असते.
दरम्यान, टॉस जिंकत मुंबईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पोलार्डच्या खेळीच्या जोरावर मुंबईनं 150 धावा केल्या. वॉटसनची खेळी व्यर्थ गेली. त्याने 59 चेंडूत 80 धावांची खेळी केली. यात त्याने 8 चौकार आणि 4 षटकार मारले. शेवटच्याच षटकात तो मलिंगाच्या गोलंदाजीवर धावबाद झाला. दरम्यान मुंबईनं दिलेल्या 150 धावांचा पाठलाग करताना ड्यु प्लेसिस बाद झाल्यानंतर सुरेश रैना आणि अंबाती रायडू पाठोपाठ बाद झाले झाला. रैनाला राहुल चहरनं तर, रायडूला बुमराहनं बाद केले. रैना 8 धावांवर तर, रायडू केवळ एक धाव करत बाद झाला.
वाचा- IPL 2019 : धोनी आणि रोहित नाही तर, फायनलमध्ये ‘तिची’ चर्चा
वाचा- IPL 2019 : धोनीची स्मार्ट खेळी, ट्रॅपमध्ये फसला रोहित
वाचा- IPL 2019 : कतरीना कैफ करणार MI ला सपोर्ट, पण सलमान म्हणतो...
मुंबईतील ATMमध्ये तरुणीसमोर युवकाचं हस्तमैथुन, मुलीनेच शूट केला VIDEO