VIDEO : इतर संघांपेक्षा मुंबईची जास्त भीती? पाहा धोनी काय म्हणाला

VIDEO : इतर संघांपेक्षा मुंबईची जास्त भीती? पाहा धोनी काय म्हणाला

चेपॉकवर चेन्नईला मुंबईविरुद्ध 2010 पासून एकही विजय मिळवता आलेला नाही.

  • Share this:

चेन्नई, 07 मे : आयपीएलच्या 12 व्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना चेन्नई आणि मुंबई यांच्यात सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून धोनीने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. नाणेफेक झाल्यानंतर बोलताना धोनीने संघाच्या रणनितीबद्दल सांगितले. कोणत्याही गोष्ट सहज लक्षात राहतील याकडे लक्ष देतो असं धोनी म्हणाला.

संघातील खेळाडूंच्या स्थानाबद्दल विचारले असता धोनी म्हणाला आम्ही आमच्या तयारीवर जास्त लक्ष देण्याला प्राधान्य देतो. संघातील खेळाडूंच्या स्थानाबद्दल विचार करत नाही. जर आम्ही इतर संघांच्या तुलनेत मुंबईच्या संघाकडे जास्त लक्ष दिलं असं कोणाचं म्हणणं असेल तर ते चुकीचं आहे. आयपीएल ही एक मोठी स्पर्धा आहे. यात कोणत्याही संघाला कमी जास्त ठरवता येणार नाही. तरीही मुंबईचा संघ संतुलित आहे असे धोनी म्हणाला.

चेन्नईने आजच्या सामन्यात मैदन फिरकीला अनुकूल असल्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईचा खेळाडू केदार जाधव दुखापतीमुळे बाहेर पडला असून त्याच्या जागी मुरली विजयला संघात स्थान मिळाले आहे.


मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा नाणेफेक झाल्यानंतर बोलताना म्हणाला की, आम्हीसुद्धा पहिल्यांदा फलंदाजीच घेतली असती. आमचे या मैदानावरील रेकॉर्ड चांगले असले तरी आजची कामगिरी महत्त्वाची आहे. संघात मॅकग्लेनच्या जाही जयंत यादवला संधी दिल्याचे रोहित शर्माने सांगितले.

चेपॉकची खेळपट्टी फिरकीला अनुकूल आहे. या मैदानावर 2010 पासून चेन्नईला मुंबईविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही.

वाचा- IPL 2019 : रोहितच्या 'या' हुकुमी एक्क्यानं धोनी देणार मुंबईला मात


VIDEO: लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलं भाकीत
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2019 08:33 PM IST

ताज्या बातम्या