VIDEO : गुप्टिलचा षटकार पाहून दिल्लीच्या कर्णधाराचे डोळे दिपले

हैदराबादचा फलंदाज गुप्टिलने 19 चेंडूत 36 धावांची खेळी केली. यात त्याने 4 उत्तुंग षटकार मारले.

News18 Lokmat | Updated On: May 8, 2019 09:11 PM IST

VIDEO : गुप्टिलचा षटकार पाहून दिल्लीच्या कर्णधाराचे डोळे दिपले


चेन्नई, 08 मे : आयपीएलच्या 12 व्या हंगामातील प्लेऑफमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात बाद फेरीचा सामना चेपॉकवर होत आहे. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हैदराबादच्या मार्टिन गुप्टिलने 19 चेंडूत 36 धावांची खेळी करून धडाक्यात सुरुवात केली.

गुप्टिलने त्याच्या वेगवान खेळीत 4 षटकार मारले. यात इशांत शर्माच्या गोलंदाजीवर मारलेला षटकार पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं. चेंडू इतक्या उंच गेला की तो पुन्हा खाली येईपर्यंत दिसला नाही. हा षटकार 86 मीटर लांब गेला असला तरी उंचीच्या बाबतीत बरेच अंतर गाठले.

पॉवर प्लेमध्येच गुप्टिलने 4 षटकार मारले. यातील पहिला षटकार इशांत शर्माच्या गोलंदाजीवर मारला. त्यानंतर ट्रेंट बोल्टला त्याने सलग दोन चेंडूवर षटकार मारले. तर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवरही त्याने एक षटकार खेचला. शेवटी अमित मिश्राच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला.


Loading...

गुणतक्त्यात तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली आणि सनरायझर्स यांच्यातील विजेत्या संघाची फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी चेन्नईशी लढत होणार आहे. दोन्ही संघांसाठी ही लढत महत्त्वाची असून यात पराभव झाल्यास स्पर्धेतून बाहेर पडावे लागणार आहे.

VIDEO: धारदार शस्त्रांनी घरफोडी, थरकाप उडवणारी घटना CCTVमध्ये कैद


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 09:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...