वर्ल्डकपसाठी IPL मध्ये स्वार्थी बनला दिनेश कार्तिक, क्रिकेटपटूचा आरोप

वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट संघाची सोमवारी घोषणा करण्यात येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 15, 2019 08:31 AM IST

वर्ल्डकपसाठी IPL मध्ये स्वार्थी बनला दिनेश कार्तिक, क्रिकेटपटूचा आरोप

नवी दिल्ली, 15 एप्रिल : वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा सोमवारी होणार आहे. यापूर्वी संघात कोणाला संधी मिळू शकेल याचे अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान पश्चिम बंगालचे क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी कोलकाता नाइट रायडर्स आणि कर्णधार दिनेश कार्तिकवर आरोप केले आहेत. त्यांनी युवा फलंदाज शुभमन गिलच्या क्रमाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच कार्तिकला स्वार्थी असल्याचं म्हटलं आहे.

मनोज तिवारी यांनी अनेक ट्विट करत केकेआरच्या व्यवस्थापनावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, शुभमन गिल या सामन्यात खेळत आहे का? आता मला समजलं उद्या तर वर्ल्डकपसाठी संघ निवड होणार आहे. कोण म्हणतं हा सांघिक खेळ आहे. कधी कधी पुढे पुढे राहणं योग्य असतं.

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिलला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आलं होतं. त्याने 20 चेंडूत 15 धावा केल्या. यात त्याला एकही चौकार, षटकार मारता आला नाही. त्याच्याआधीच्या सामन्यात शुभमन सलामीला उतरला होता. तेव्हा त्याने 65 धावा केल्या होत्या. त्यानंतर शुभमनला वरच्या क्रमांकावर खेळण्यासाठी पाठवण्याची मागणी केली.

मनोज तिवारी यांनी याकडे लक्ष वेधण्यासाठी दुसरे ट्विट केले आहे. त्यात म्हटले की, जेव्हा कोणी आधीच्या सामन्यात 65 धावांची खेळी केली असेल तेव्हा त्याला वरती खेळवणं योग्य असेल. परदेशी खेळाडूंच्या जागी आपल्या खेळाडूंना फलंदाजीत संधी दिली पाहिजे.

मनोज तिवारी आयपीएलमध्ये केकेआर, दिल्ली डेअरडेविल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि पुण्याकडून खेळले आहेत. तर भारतीय संघाकडून 12 एकदिवसीय आणि 3 टी20 सामने खेळले आहेत.

'भाड में गया कानून, भाड में गई आचारसंहिता'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 08:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close