पंजाबचा दिल्लीवर 14 धावांनी विजय, सॅम करनची हॅट्ट्रिक

पंजाबचा दिल्लीवर 14 धावांनी विजय, सॅम करनची हॅट्ट्रिक

शेवटच्या षटकात सॅम करनची हॅट्ट्रिक

  • Share this:

मोहाली, 1 मार्च : पंजाब विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय़्यरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबने दिलेल्या 167 धावांचे आव्हान पार करताना दिल्लीला 152 धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबने हा सामना 14 धावांनी जिंकला. शेवटच्या षटकांत विकेट गमावल्याने सामना दिल्लीच्या हातातून निसटला.

शिखर धवन 30, ऋषभ पंत 39, कोलिन इनग्राम 38 तर श्रेयस अय्यरने 30 धावा केल्या. सलामीवीर पृथ्वी शॉला पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद केलं. मात्र, त्यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यरने 60 धावांची भागिदारी केली. अय्यरचा त्रिफळा उद्ध्वस्त करत विलजोइनने दिल्लीला दुसरा धक्का दिला. त्यानंतर अश्विनने धवनला बाद केले.

धवननंतर मैदानात आलेल्या कोलिनने पंतसोबत 62 धावांची भागिदारी केली. संघाच्या 144 धावा झाल्या असताना पंतला शमीने बाद केले. त्यानंतर लगेच ख्रिस मोरीस धावबाद झाला आणि पंजाबने सामन्यावर पकड मिळवली. त्यानंतर कोलिन इनग्राम आणि हर्षल पटेल दोघेही सॅम करनच्या गोलंदाजीवर झेल देऊन बाद झाले.

शेवटच्या दोन षटकात दिल्लीला 19 धावांची गरज होती. तेव्हा शमीने 18 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हनुमा विहारीचा त्रिफळा उडवला. कसिगो रबाडा आणि लिमछाने यांना करनने बाद करून हॅट्ट्रिकसह संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

युनिव्हर्सल बॉसच्या अनुपस्थितीत मैदानात उतरलेल्या पंजाबला 9 बाद 166 धावांपर्यंत मजल मारता आली. सलामीवीर लोकेश राहुलने 15 धावा केल्या तर सॅम करन 20 धावा करून बाद झाला. त्यानंतर मयंक अग्रवालला 6 धावाच करता आल्या. त्यानंतर सर्फराज खान आणि डेव्हिड मिलरने 60 धावांची भागिदारी केली. सर्फराजने 39 तर मिलरने 43 धावा केल्या. त्यानंतर मनदीप सिंगने नाबाद 29 धावांची खेळी केली. दिल्लीकडून ख्रिस मोरीसने सर्वाधिक 3 गडी बाद केले तर कसिगो रबाडा आणि संदीप लमिछने यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 1, 2019 11:55 PM IST

ताज्या बातम्या