CSK vs KXIP : घरच्या मैदानावर पंजाबचं किंग, चेन्नईवर 6 विकेटनं विजय

CSK vs KXIP : घरच्या मैदानावर पंजाबचं किंग, चेन्नईवर 6 विकेटनं विजय

चौकार षटकारांच्या आतषबाजीत गेलपेक्षा राहुल अधिक आक्रमक खेळ केला.

  • Share this:

मोहाली, 05 मे : प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं पंजाबचं आव्हान जरी संपुष्टात आलं असलं तरी, घरच्या मैदानावर विजय मिळवत पंजाबनं आपला शेवट गोड केला आहे. पंजाबनं चेन्नईवर 6 विकेट राखत विजय मिळवला. दरम्यान टॉस जिंकत पंजाबनं गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यामुळं प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईनं पंजाबला 171 धावांचे आव्हान दिलं होतं. हे आव्हान पंजाबनं 17व्या ओव्हरमध्ये पुर्ण केलं.

दरम्यान, 171 धावांचा पाठलाग करताना लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी पंजाबला धडाकेबाज सुरुवात करून दिली. चौकार षटकारांच्या आतषबाजीत गेलपेक्षा राहुल अधिक आक्रमक खेळ केला. लोकेशने 19 चेंडूंत अर्धशतक केले. आयपीएलमधील हे तिसरे जलद अर्धशतक ठरले. गेल आणि राहुल यांनी 12च्या सरासरीनं चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली. गेल आणि राहुल यांनी 12च्या सरासरीनं चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली.

गेल आणि राहुल या दोघांची 108 धावांची भागीदारी हरभजन सिंगने संपुष्टात आणली. भज्जीनं 11व्या षटकात राहुल व गेल यांना लागोपाठ माघारी पाठवले. भज्जीची हॅटट्रिक मात्र हुकली. राहुल 36 चेंडूंत 7 चौकार व 5 षटकार खेचून 71 धावा करत माघारी परतला. गेलने 28 चेंडूंत 28 धावा केल्या. भज्जीनं पुढच्याच षटकात पंजाबला आणखी एक धक्का देत मयांक अग्रवालला माघारी पाठवले.

भज्जीनं पुढच्याच षटकात पंजाबला आणखी एक धक्का देत मयांक अग्रवालला माघारी पाठवले.

प्रथम फलंदाजीकरिता आलेल्या चेन्नईच्या ड्यु प्लेसिस आणि वॉटसन या शिलेदारांनी पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी केली. चेन्नईने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 42 धावा केल्या. यंदाच्या आयपीएलमधील ही पॉवर प्लेमधील पाचवी सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यानंतर मात्र पंजाबला सॅम कुरननं पहिलं यश मिळवून दिलं. पाचव्या षटकात वॉटसनला त्रिफळाचीत केले. पण, फॅफ ड्यू प्लेसिस आणि सुरेश रैना यांनी चेन्नईचा डाव सावरला. केवळ 4 धावांनी ड्यु प्लेसिसचं या हंगामातलं पहिलं शतक हुकलं. मात्र या दोघांनी, ड्यू प्लेसिस आणि रैना यांनी 67 धावांच्या भागीदारीचा पल्ला ओलांडताच एक विक्रम नावावर केला. पंजाबविरुद्ध यंदाच्या मोसमात चेन्नईकडून ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून विक्रमाला गवसणी घातली. त्यांना अंबाती रायुडू व महेंद्रसिंग धोनी यांचा विक्रम मोडला.

पंजाबकडून सॅम करननं उत्कृष्ठ गोलंदाजी करत 3 विकेट घेतल्या. त्याशिवाय पंजाबच्या एकही गोलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. दरम्यान शेवटच्या ओव्हरमध्ये शमीनं चांगली गोलंदाजी केवळ 5 धावा देत 2 विकेट घेतल्या.

दरम्यान या पराभवामुळं चेन्नईनं आपलं स्थान गमवले आहे. तरी दुसऱ्या क्रमाकांवर असलेली चेन्नई 7 मेला प्ले ऑफमध्ये आपला पहिला सामना खेळणार आहे. त्यामुळं चेन्नईनं हा सामना गमावल्यास त्यांना आणखी एक संधी मिळणार आहे.

SPECIAL REPORT: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुलींकडून दाढी करून घेतो...

First published: May 5, 2019, 3:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading