प्रीती झिंटाच्या संघासमोर अशक्य आव्हान, ...तर प्लेऑफमध्ये संधी

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात विजय मिळवून पंजाबला प्लेऑफमध्ये पोहचता येईल पण....

News18 Lokmat | Updated On: May 5, 2019 06:30 PM IST

प्रीती झिंटाच्या संघासमोर अशक्य आव्हान, ...तर प्लेऑफमध्ये संधी

मुंबई आणि कोलकाता यांच्यात रविवारी होणाऱ्या सामन्याच्या निकालावर चौथ्या स्थानावर कोण हे निश्चित होईल. चेन्नई, दिल्ली आणि मुंबईनं प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं आहे. त्याआधी चेन्नई आणि पंजाब यांच्यात सामना होणार आहे.

रविवारी पहिला सामना पंजाब आणि चेन्नई यांच्यात होणार आहे. चेन्नई गुणतक्त्यात पहिले स्थान कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरेल. तर पंजाब हा सामना जिंकून शेवट विजयाने करण्यासाठी खेळेल.

पंजाबला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता येईल. मात्र, त्यासाठी त्यांना चेन्नईला मोठ्या फरकाने पराभूत करावं लागेल.  प्रिती झिंटाचा हा संघ 10 गुणांसह शेवटच्या क्रमांकावर आहे.

Loading...

प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आता केकेआर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात स्पर्धा आहे. सनरायझर्स आणि पंजाबला केकेआरच्या पराभवाची प्रार्थना करावी लागणार आहे. तरच हैदराबाद रनरेटच्या जोरावर प्लेऑफमध्ये प्रवेश मिळेल.

पंजाबला प्लेऑफमध्ये पोहचायचे असेल तर चेन्नईला किमान 250 धावांनी पराभूत करण्याचं अशक्यप्राय आव्हान असेल. त्यासाठी मोठी धावसंख्या उभा करावी लागेल. चेन्नईसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध इतका मोठा विजय अशक्य आहे. तसेच कोलकाताविरुद्ध मुंबईचा विजयही यासाठी महत्त्वाचा आहे.

चेन्नईचा 42 पेक्षा जास्त धावांनी पराभव झाल्यास किंवा 5.4 षटके राखून पंजाबने विजय मिळवला तर चेन्नईचे पहिले स्थान धोक्यात येईल. त्यात मुंबईने केकेआरला पराभूत केलं तर चेन्नई थेट तिसऱ्या स्थानावर घसरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2019 03:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...