VIDEO : शाहरुखच्या संघातील 'हा' खेळाडू ठरला खलनायक

VIDEO : शाहरुखच्या संघातील 'हा' खेळाडू ठरला खलनायक

साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात कोलकाताला मुंबईविरुद्ध पराभव पत्करावा लागला यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये स्थान पटकावता आले नाही.

  • Share this:

मुंबई, 06 मे : आयपीएलच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात कोलकाताला मुंबईविरुद्ध विजय आवश्यक होता. मात्र, प्रथम फलंदाजीला उतरलेल्या कोलाकाता नाइट रायडर्सला 133 धावाच करता आल्या. कोलकात्यासाठी ख्रिस लिनने 29 चेंडूत 41 धावांची खेळी केली. त्यानंतर रॉबिन उथप्पाने 40 धावा केल्या. मात्र, उथप्पाने त्यासाठी 47 चेंडू घेतले.

रॉबिन उथप्पाने खेळलेल्या 47 चेंडूतील 25 चेंडूवर एकही धाव काढता आली नाही. यात मिशेल मॅक्लेनघनच्या षटकात एकही धाव घेतली नाही. उथप्पाच्या या संथ खेळीने चाहतेच नाही तर कमेंट्री करणाऱ्या आकाश चोपडा आणि हर्षा भोगले यांनीही प्रश्न उपस्थित केला.

मुंबईनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि हा निर्णय मुंबईचे फलंदाज सार्थ ठरवताना दिसत आहे. पण लिननं तुफानी सुरुवात करत 6 ओव्हरमध्ये कोलकाला 49 धावा करुन दिल्या. दरम्यान रोहितनं मोक्याच्या क्षणी हार्दिक पांड्याच्या हातात चेंडू दिला आणि पहिल्याचा चेंडूत त्यानं शुभमन गिलला बाद केला. कोलकातासाठी गिल हा महत्त्वाचा खेळाडू असताना त्यांच्या विकेटचा फटका कोलकाताला नक्कीच बसणार आहे. त्यानंतर हार्दिकनं आक्रमक फलंदाजी करणाऱ्या ख्रिस लिनला 41 धावांवर बाद केलं. त्यानंतर रॉबीन उथप्पानं खेळ सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो 40 धावा करत बाद झाला.

कोलकाताच्या फलंदाजीवेळी सामन्याला कलाटणी मिळाली ती मलिंगाच्या 12व्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये मलिंगानं कोलकाताला मोठा झटका देत कर्णधार दिनेश कार्तिक आणि तडाखेबाद फलंदाज आंद्रे रसेल यांना बाद केले. मलिंगाच्या गोलंदाजीवर रसेलला भोपळाही फोडता आला नाही. या ओव्हरमुळे कोलकाताचं प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं स्वप्न भंगले. या सामन्यात मलिंगानं 3 तर हार्दिक पांड्यानं 2 विकेट घेतल्या.

VIDEO : धोनीचा ‘गुरुमंत्र’, एका रात्रीत पलटला रैनाचा खेळ

VIDEO : 'काँग्रेसवालों....तुम्हारा यह डर मुझे अच्छा लगता है'

First published: May 6, 2019, 10:07 AM IST

ताज्या बातम्या