मुंबईच्या 'या' खेळाडूचं मातृप्रेम! भरमैदानात अशी जागवली होती आईची आठवण

दिल्लीकडून खेळलेल्या या खेळाडूला मुंबईने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात संधी दिली.

News18 Lokmat | Updated On: May 7, 2019 09:12 PM IST

मुंबईच्या 'या' खेळाडूचं मातृप्रेम! भरमैदानात अशी जागवली होती आईची आठवण

मुंबई, 07 मे : आय़पीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबईने जयंत यादवला संधी दिली आहे. क्वालिफायरच्या सामन्यात विजय मिळवून थेट फायनल गाठण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरले आहेत. यात मुंबईने दिल्लीकडून खेळलेल्या जयंत यादवला संघात घेतलं आहे. जयंत यादवने दिल्लीकडून दोन हंगामात मिळून 10 सामने खेळले आहेत. यंदा त्याला मुंबईने विकत घेतलं.

हरियाणाचा असलेला जयंत यादव अष्टपैलू खेळाडू आहे. ऑफ ब्रेक गोलंदाजी करणाऱ्या जयंतने कसोटी आणि एकदिवसीय सामनेही खेळले आहेत.

जयंतच्या पाठिशी त्याच्या दोन आईंचा आशीर्वाद आहे. एका आईने जन्म दिला तर दुसऱ्या आईने पालन केलं. जन्मदात्रीचा 19 वर्षांपूर्वी एका विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर ज्योती यादव यांनी त्याचा सांभाळ केला.

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात त्याने आईचे नाव असलेली जर्सी घातली होती. तेव्हा जयंतने म्हटंल होतं की मला जर्सीवर दोन्ही आईची नावे हवी होती मात्र असं होऊ शकलं नाही. तेव्हा जन्मदात्रीचं नाव जर्सीवर होतं म्हणून त्याने सांभाळ केलेल्या आईची माफीही मागितली होती.

चेन्नईने आजच्या सामन्यात मैदना फिरकीला अनुकूल असल्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईचा खेळाडू केदार जाधव दुखापतीमुळे बाहेर पडला असून त्याच्या जागी मुरली विजयला संघात स्थान मिळाले आहे.

Loading...

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा नाणेफेक झाल्यानंतर बोलताना म्हणाला की, आम्हीसुद्धा पहिल्यांदा फलंदाजीच घेतली असती. आमचे या मैदानावरील रेकॉर्ड चांगले असले तरी आजची कामगिरी महत्त्वाची आहे. संघात मॅकग्लेनच्या जाही जयंत यादवला संधी दिल्याचे रोहित शर्माने सांगितले.

चेपॉकची खेळपट्टी फिरकीला अनुकूल आहे. या मैदानावर 2010 पासून चेन्नईला मुंबईविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही.


VIDEO: लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलं भाकीत


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2019 09:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...