...अन् जडेजाने आपल्याच संघातील खेळाडूचा घेतला झेल, पाहा VIDEO

...अन् जडेजाने आपल्याच संघातील खेळाडूचा घेतला झेल, पाहा VIDEO

चेन्नईने कोलकाताविरुद्धचा सामना 7 गडी राखून जिंकला.

  • Share this:

चेन्नई, 9 एप्रिल : आयपीएलच्या 12 व्या हंगामात चेन्नई आणि कोलकाता यांच्यात चेपॉक येथे सामना सुरु आहे. या सामन्यात कोलकाताने दिलेल्या 109 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचे 2 गडी बाद झाले. फाफ डुप्लेसी आणि अंबाती रायडु खेळत आहेत. तर वॉटसन 9 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. सुनिल नरेनच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. त्यानेच सुरेश रैनाला बाद केले. रैनाने 13 चेंडूत 14 धावा केल्या.

दरम्यान, सुनिल नरेनच्या तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर सुरेश रैनाने उत्तुंग षटकार खेचला. यावेळी सीमारेषेबाहेर डगआऊटमध्ये बसलेला चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने हा चेंडू पकडला. त्यानंतरच्या नरेनच्याच षटकात रैना पियुष चावलाकडे झेल देऊन बाद झाला.

तत्पूर्वी, CSK चा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर दीपक चहरच्या भेदक माऱ्याने केकेआरला 108 धावांत रोखले. केकेआरच्या पहिल्या चारपैकी तीन फलंदाजांना चहरने बाद केले. यंदाच्या आयपीएलमध्ये पाचवा विजय मिळवण्यासाठी चेन्नईला 109 धावांची गरज आहे. आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक वगळता इतर फलंदाज जास्त धावा करू शकले नाहीत.

सुरुवातीला चहरच्या माऱ्यासमोर त्यानंतर इम्रान ताहीर आणि हरभजनच्या फिरकीपुढे नाइट रायडर्सच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. रसेलने 44 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या.यात 5 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. दिनेश कार्तिक 21 चेंडूत 19 धावा काढून ताहीरच्या गोलंदाजीवर बाद झाला. शुभमन गिलसुद्धा ताहिरची शिकार झाला. त्याने फक्त 9 धावा केल्या. पियुष चावला हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर यष्टीचित झाला. त्याच्यानंतर प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादवला भोपळाही फोडता आला नाही.

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या कोलकाताची सुरुवात निराशाजनक झाली. केकेआरचे 3 फलंदाज 10 धावांमध्ये तंबूत परतले. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने सलामीवीर ख्रिस लीनला पायचित केलं. त्यानंतर पुढच्या षटकात हरभजन सिंगने सुनिल नरेनला बाद केलं. सुनिल नरेनने 6 धावा केल्या. तर लिनला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर तिसऱ्या षटकात दीपक चहरने नीतीश राणाला शून्यावर बाद करून संघाला तिसरा धक्का दिला. पाचव्या षटकांत पुन्हा चहरनेच रॉबिन उथप्पाला बाद केले. उथप्पा 11 धावांवर झेलबाद झाला.

VIDEO: पराभवाच्या भीतीने महाआघाडीतले पक्ष एकत्र; मोदींचा महाआघाडीला टोला

First published: April 9, 2019, 11:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading