'मी फक्त 21 वर्षांचा, रात्रीत गोष्टी बदलत नाहीत'

वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात निवड न झालेल्य पंतने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तरीही त्याच्या एका कमतरतेबद्दल चर्चा होत आहे.

News18 Lokmat | Updated On: May 8, 2019 07:11 PM IST

'मी फक्त 21 वर्षांचा, रात्रीत गोष्टी बदलत नाहीत'

दिल्ली, 08 मे : आयपीएलच्या 12 व्या हंगामात दिल्लीचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने चांगली कामगिरी केली आहे. भारताच्या वर्ल्ड कप संघात त्याची निवड झाली नाही. त्याच्याऐवजी संघात दिनेश कार्तिकला स्थान देण्यात आलं. आयपीएलमधील कामगिरीनंतरही त्याची कमतरता समोर आली आहे. खेळपट्टीवर जम बसल्यानंतरही बेजबाबदारपणे तो बाद होतो. याबद्दल त्याच्यावर अनेक माजी क्रिकेटपटूंनी प्रश्न उपस्थित केला होता.

बेजबाबदारपणे बाद होण्याबद्दल पहिल्यांदाच त्याने मौन सोडलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल आपली बाजू मांडली आहे. पंत म्हणाला की, मी फक्त 21 वर्षांचा आहे. एका रात्रीत काही बदलत नाही. मी या वयात 30 वर्षांच्या खेळाडूप्रमाणे विचार करू शकत नाही. माझे विचार बदलण्यास वेळ लागेल. काळानुसार माझे विचार परिपक्व होतील असंही त्याने सांगितलं.

यावेळी त्याने विराटने दिलेल्या सल्ल्याचाही पुनरुच्चार केला. विराटने सांगितलं होतं की, अनुभवी होण्यासाठी 100 सामने खेळण्याची गरज नाही. दहा सामन्यातही अनुभव मिळू शकतो. इतर खेळाडूंच्या चुकांमधून शिकण्याची आणि त्या पुन्हा होणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचं विराटनं सांगितलं होतं.


वाचा-चेन्नईच्या फलंदाजांच्या 'या' चुका मी हेरल्या : सुर्यकुमार यादव

Loading...

आयपीएलमध्ये रिषभ पंतने 14 सामन्यात 401 धावा केल्या आहेत. 150 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने त्यानं या धावा केल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. यष्टीरक्षणातही त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने 23 फलंदाजांना बाद केलं. यात 17 झेल आणि सहा जणांना यष्टीचित केलं आहे.

VIDEO: धारदार शस्त्रांनी घरफोडी, थरकाप उडवणारी घटना CCTVमध्ये कैदबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 07:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...