VIDEO : धोनी 2020 मध्ये IPL खेळणार की नाही?

VIDEO : धोनी 2020 मध्ये IPL खेळणार की नाही?

आयपीएलनंतर वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होणार आहे. हा त्याचा शेवटचा वर्ल्ड कप असेल असंही म्हटलं जात आहे.

  • Share this:

हैदराबाद, 13 मे : आयपीएलच्या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर मुंबईने चेन्नईला एका धावेनं पराभूत करून विजेतेपद पटकावलं. 20 व्या षटकात चेन्नईला 9 धावांची गरज होती. यात चेन्नईचा फलंदाज शेन वॉटसन आणि रविंद्र जडेजा मैदानात होते. मलिंगाच्या प्रत्येक चेंडूगणिक सामन्यात कोण जिंकणार याची उत्कंठा वाढत होती.

शेन वॉटसन अखेरच्या षटकात दुसरी धाव घेताना आऊट झाला आणि तिथेच सामना फिरला. वॉटसन बाद झाल्यानंतर शार्दुल ठाकुरला शेवटच्या चेंडूवर मलिंगाने यॉर्कर टाकून बाद केलं. याच चेंडूने मुंबईला विजेता ठरवले.

चेन्नईने आठव्यांदा फायनलला धडक मारली होती. त्यांना फायनलला पराभव पत्करावा लागल्याने चौथ्यांदा आयपीएल जिंकण्याचं स्वप्न भंगलं. यानंतर बोलताना चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पुढच्या वर्षी आयपीएल खेळणार की नाही याचा खुलासा केला आहे. धोनीला प्रश्न विचारण्यात आला की 2020 मध्ये आयपीएल खेळताना दिसणार का? त्यावर धोनीने बहुतेक हो असं उत्तर दिलं.

याशिवाय सामन्याबद्दल धोनी म्हणाला की, हा सामना असा होता की यात अधिक चांगली कामगिरी होऊ शकली असती. पण धोनीसाठी चितेंचा विषय होती ती, मधली फळी. त्यानेच धोनीला दगा दिला. दरम्यान धोनीनं अंतिम सामन्यापर्यंत पोहचण्याच श्रेय आपल्या गोलंदाजांना दिलं. संजय मांजरेकर यांनी धोनीला निवृत्ती संदर्भात विचारले असता, ''सध्या माझे प्राधान्य विश्वचषक आहे. आयपीएल आणि चेन्नई यांच्याबाबत मी नंतर बोलेन. आमची गोलंदाजी चांगली आहे. मात्र फलंदाजीवर लक्ष्य केंद्रित करावे लागेल.'असंही धोनी म्हणाला.

मुंबईतील ATMमध्ये तरुणीसमोर युवकाचं हस्तमैथुन, मुलीनेच शूट केला VIDEO

First published: May 13, 2019, 2:26 PM IST
Tags: ipl 2019

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading