धोनीबद्दल पांड्याच्या 'या' पोस्टने जिंकलं नेटकऱ्यांचं मन

धोनीबद्दल पांड्याच्या 'या' पोस्टने जिंकलं नेटकऱ्यांचं मन

चेन्नईला 6 विकेटने नमवून मुंबई इंडियन्सने दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. यानंतर हार्दिक पांड्याने केलेल्या पोस्टची चर्चा सुरु आहे.

  • Share this:

चेन्नई, 08 मे : महेंद्रसिंग धोनीचे चाहते जगभरात आहेत. भारतीय संघातील खेळाडूसुद्धा त्याला आदर्श मानतात. त्याचं यष्टीरक्षण असो किंवा फलंदाजी त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकायल मिळतात. त्याच्या या चाहत्यांमध्ये हार्दिक पांड्याचाही समावेश आहे.

पहिल्या क्वालिफायर सामन्यातील मुंबईच्या चेन्नईवर विजयानंतर हार्दिक पांड्याने भावुक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने फोटो शेअर करताना म्हटलं आहे की, धोनी माझी प्रेरणा, माझा मित्र, माझा भाऊ आहे. बुधवारी झालेल्या सामन्यावेळी दोघांचा हात मिळवत असलेला फोटो पांड्याने शेअर केला आहे.

मुंबई इंडियन्सने पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जला 6 गडी राखून पराभूत केलं. या विजयासह मुंबईने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. चेन्नईने दिलेलं 132 धावांचं आव्हान मुंबईने 18.3 षटकांत पूर्ण केलं. या विजयात सुर्यकुमार यादवने 54 चेंडूत 71 धावांची खेळी करून महत्त्वाची भूमिका पार पाडली. मुंबईने पाचव्यांदा फायनल गाठली आहे. तर चेन्नईला अजुनही फायनलला पोहोचण्याची एक संधी आहे. बुधवारी एलिमिनेटर सामन्यात दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे.

वाचा-IPL 2019 : आऊट झाल्यानंतर रोहितची मैदानात एण्ट्री, धोनीही झाला शॉक

क्वालिफायर 1 मध्ये चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी 20 षटकात 4 बाद 131 धावा केल्या. रायडुने 37 चेंडूत 42 धावा केल्या. तर धोनीने 29 चेंडूत 37 धावा केल्या. मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू राहुल चाहरने जबरदस्त कामगिरी करताना 4 षटकात 14 धावा देत 2 विकेट घेतल्या. तर कृणाल पांड्या आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

वाचा- IPL 2019 : सामना जिंकला मुंबईनं, पण चर्चा मात्र चेन्नईच्या ‘या’ खेळाडूची

वाचा-चेन्नईच्या फलंदाजांच्या 'या' चुका मी हेरल्या : सुर्यकुमार यादव

VIDEO: धारदार शस्त्रांनी घरफोडी, थरकाप उडवणारी घटना CCTVमध्ये कैद

First published: May 8, 2019, 5:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading