मुंबई, 23 एप्रिल : इंडियन प्रीमियल लीगमध्ये आरसीबीची वाटचाल निराशाजनक अशीच आहे. मात्र, डेल स्टेन संघात येताच त्यांच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नईवर फक्त एका धावेनं पराभव करून आरसीबीने रोमहर्षक विजय मिळवला. यामुळे त्यांच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत आहेत. या विजयात शेवटच्या चेंडूवर चेन्नईच्या शार्दुल ठाकूरला धावबाद करून पार्थिव पटेलने मोलाची कामगिरी केली आहे.
आरसीबीच्या विजयानंतर अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात आरसीबीचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन पार्थिव पटेलचं कौतुक करताना दिसत आहेत. कर्स्टन पार्थिव पटेलसोबत बोलत असतानाच त्या ठिकाणी युझवेंद्र चहल नाचत येतो. तेव्हा कर्स्टन यांनी चहलचेसुद्धा कौतुक केले. हा व्हिडीओ शेअर करताना सुपर चॅलेंजर पार्थिव पटेल आणि चॅम्पियन युझवेंद्र चहल यांच्यासोबतचे काही क्षण असा कॅप्शन दिला आहे.
#GoodTimes at the RCB camp! Super Challenger @parthiv9, gaffer @Gary_Kirsten & champ @yuzi_chahal share a light moment post game. 😍😍
— Royal Challengers (@RCBTweets) April 22, 2019
Let's keep it this way until the end of the season, Challengers! #GameByGame #NeverBackDown #PlayBold pic.twitter.com/w0qDAocsjj
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने यंदाच्या आयपीएलमध्ये फक्त तीन विजय मिळवले आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्याचा त्यांचा मार्ग खडतर आहे. यासाठी त्यांना पुढचे चारही सामने जिंकून इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागणार आहे.
पॉइंट टेबल
सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
VIDEO: ...म्हणून मोदी पवारांविरोधात बोलतात- रोहित पवार