VIDEO : चौकार, डेड बॉल की हिट विकेट?

VIDEO : चौकार, डेड बॉल की हिट विकेट?

आंद्रे रसेलने टाकलेल्या 19 व्या षटकातील एका चेंडूवर नाट्यमय घडामोडी घडल्या.

  • Share this:

कोलकाता, 26 एप्रिल : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या कोलकाता आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात राजस्थानने 3 गडी राखून विजय मिळवला. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या नाबाद 97 धावांच्या खेळीनंतरही राजस्थानने 3 गडी राखून सामना जिंकला. कोलकात्याने दिलेले 176 धावांचे आव्हान 19.2 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसन यांच्या अर्धशतकी भागिदारीनंतर राजस्थानची अवस्था 5 बाद 98 अशी झाली होती. त्यानंतर डावाची सूत्रे आपल्या हाती घेत रियान परागने 31 चेंडूत 47 धावांची खेळी केली. 19 व्या षटकात तो हिट विकेट बाद झाला. त्याला स्टुअर्ट बिन्नी, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपालने साथ दिली. जोफ्रा आर्चरने 12 चेंडूत 27 धावांची खेळी करत कोलकाताचा विजय हिरावून घेतला.

19 व्या षटकात रसेलच्या गोलंदाजीवर रियान पराग हिट विकेट बाद झाला. यावेळी परागची बॅट स्टम्पला लागल्याने तो हिट विकेट बाद झाला. रसेलने टाकलेला शॉर्ट बॉल परागच्या बॅटला लागून यष्टीमागे उभ्या असलेल्या कार्तिकच्या मागे पडला आणि सीमारेषेला गेला. पंचांनी चौकार दिला पण तेवढ्यात स्टम्प उडाल्याचेही दिसले. तिसऱ्या पंचांनी रियान परागला बाद दिले. 31 चेंडूत 47 धावा केल्या.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेल्या राजस्थानने कोलकाता नाइट रायडर्सला 20 षटकांत 6 बाद 175 धावांवर रोखले.दिनेश कार्तिकने 50 चेंडूत 97 धावा केल्या. कोलकाताच्या इतर फलंदाजांना राजस्थानच्या गोलंदाजांनी जखडून ठेवलं.

मौत का कुऑं! स्टंटमननं जवळून पाहिला मृत्यू, थरारक घटनेचा LIVE VIDEO

First published: April 26, 2019, 12:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading