VIDEO : पीछे देखो पीछे! धोनी असताना 'ही' चूक म्हणजे खेळ खल्लास

चेन्नईने दिल्लीवर 80 धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नई गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर पोहचली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 11:53 PM IST

VIDEO : पीछे देखो पीछे! धोनी असताना 'ही' चूक म्हणजे खेळ खल्लास

चेन्नई, 1 मे : दिल्लीला 80 धावांनी पराभूत करून चेन्नईने घरच्या मैदानावर दणदणीत विजय साजरा केला. 179 धावांचा पाठलाग करताना दिल्लीला 99 धावांपर्यंत मजल मारता आली. आजारी पडल्याने मागच्या सामन्यात विश्रांती घेतलेल्या महेंद्रसिंग धोनीने या सामन्यात 22 चेंडूत 44 धावा करताना तुफान फटकेबाजी केली. त्यानंतर त्याने यष्टीरक्षणातही कमाल केली.

क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईने दिल्लीला 99 धावांमध्ये गुंडाळलं. महेंद्रसिंग धोनीने दोघांना यष्टीचित केलं तर एकाचा झेल घेतला. रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यर आणि ख्रिस मोरिस यांना यष्टीचित केलं. यामध्ये ख्रिस मोरिस याचा पाय क्रिजमध्ये होता. मात्र, थोडासा पाय उचललेला दिसताच धोनीनं त्याला बाद केलं.


चेन्नईने हा सामना 80 धावांनी जिंकून आयपीएलच्या गुणतक्त्यात 18 गुणांसह अव्वल स्थान प्राप्त केलं. दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ चेन्नईविरुद्धच्या सामन्यातही अपयशी ठरला. त्याने फक्त 4 धावा केल्या. दीपक चाहरने त्याला बाद केले. त्यानंतर हरभजन सिंगने शिखर धवनचा त्रिफळा उडवून चेन्नईच्या विजयातला मोठा अडथळा दूर केला. शिखर धवन 19 धावांवर बाद झाला. श्रेयस अय्यरने एका बाजुने दिलेली झुंज अपयशी ठरली. त्याने 31 चेंडूत 44 धावा केल्या.


Loading...

रिषभ पंतला इम्रान ताहिरने 5 धावांवर बाद केले. अक्षर पटेलसुद्धा इम्रान ताहिरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 9 धावा केल्या. त्यानंतर तळाच्या फलंदाजांनी हजेरी लावण्याचं काम केलं. इम्रान ताहीरने सर्वाधिक 4 तर जडेजाने 3 विकेट घेतल्या. चाहर आणि हरभजनने प्रत्येकी एक गडी बाद केला.

तत्पूर्वी, आयपीएलमध्ये गुणतक्त्यात अव्वल असलेल्या चेन्नई आणि दिल्ली यांच्यातील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 179 धावा केल्या. सलामीवीर शेन वॉटसन लवकर बाद झाल्यनंतर फाफ डु प्लेसीस आणि सुरेश रैना यांनी डाव सावरला. डुप्लेसीसला बाद करून ही अक्षर पटेलनं ही जोडी फोडली. डुप्लेसीसनं 41 चेंडूत 39 धावा केल्या. त्यानंतर सुरेश रैनाला सुचितने बाद केलं. रैनाने 37 चेंडूत 59 धावा काढल्या.

सुरेश रैना बाद झाल्यानंतर जडेजा आणि महेंद्रसिंग धोनीने वेगवान खेळी करत संघाला 179 धावांपर्यंत पोहचवलं. जडेजाने 10 चेंडूत 25 धावा केल्या. तर महेंद्रसिंग धोनी 22 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या. अंबाती रायडू 5 धावांवर नाबाद राहिला.

पॉइंट टेबल


सर्वाधिक धावा करणारे फलंदाज


सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज


SPECIAL REPORT: दुष्काळ आणि पाणीबाणीनं होरपळणाऱ्या गावाची गोष्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 11:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...