VIDEO : सामना मुंबईनं तर मन मात्र कार्तिकनं जिंकलं

VIDEO : सामना मुंबईनं तर मन मात्र कार्तिकनं जिंकलं

मुंबई इंडियन्सचा सलामीवीर डी कॉकला बाद केल्यानंतर कार्तिकचे दोन्ही संघांच्या चाहत्यांनी कौतुक केलं.

  • Share this:

मुंबई, 06 मे : आयपीएलच्या साखळी सामन्यात मुंबईने कोलकाताला पराभूत करून गुणतक्त्यात पहिलं स्थान पटकावलं. कोलकात्यानं सामना गमावला असला तरी कर्णधार दिनेश कार्तिकने सर्वांची मनं जिंकली. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताला 133 धावा करता आल्या. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबईने 9 गडी राखून हे आव्हान पूर्ण केलं. या सामन्यात मुंबई इंडियन्सची एकमेव विकेट कोलकाताला घेता आली. या विकेटबद्दल कार्तिकचे दोन्ही संघाच्या चाहत्यांनी कौतुक केलं.

मुंबईचा सलामीवीर क्विंटन डी कॉक सातव्या षटकात प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. प्रसिद्धने टाकलेल्या शॉर्ट बॉलवर डी कॉकने फाइन लेगला चेंडू टोलावला. उंच उडालेला हा चेंडू सीमारेषेवर असलेला ख्रिस लिनला झेलता आला असता. मात्र, तोपर्यंत यष्टीरक्षक कार्तिक धावत पोहचला. त्याने सूर मारून हा झेल पकडला. यावेळी धावतानाच त्याने ख्रिस लिनला सावध केलं आणि आपण झेल घेत असल्याचं सांगितलं.

आयपीएलच्या 12 व्या हंगामातील लीग सामन्यांतील शेवटचा सामना झाला. या सामन्यात मुंबई आपल्या होमग्राऊंडवर विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आली आहे. तर दुसरीकडं कोलकाताचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. कोलकातानं दिलेलं 134 धावांचं आव्हान 16.1 मुंबईनं ओव्हरमध्ये पार केलं. यात रोहितची अर्धशतकी खेळी महत्त्वाची ठरली. त्याला सुर्यकुमार यादवनंही चांगली साथ दिली.

दरम्यान मुंबईच्या विजयामुळं हैदराबादच्या संघानं 12 धावांसह प्ले ऑफमध्ये एण्ट्री घेतली आहे. रोहितला सुर्यकुमार यादवनंही चांगली साथ दिली. मुंबईनं घेतलेला गोलंदाजीचा निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. मलिंगानं कोलकाचा सामन्याला कलाटणी मिळाली ती मलिंगाच्या 12व्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये मलिंगान कोलकाताला मोठा झटका देत कर्णधार दिनेश कार्तिक आणि तुफानी फलंदाज आंद्रे रसेल यांना बाद केले. मलिंगाच्या गोलंदाजीवर रसेलला भोपळाही फोडता आला नाही.

VIDEO : धोनीचा ‘गुरुमंत्र’, एका रात्रीत पलटला रैनाचा खेळ

VIDEO : 'काँग्रेसवालों....तुम्हारा यह डर मुझे अच्छा लगता है'

First published: May 6, 2019, 11:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading